‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व दिवसेंदिवस अधिक रंजक होत चाललं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात चार नवीन सदस्यांची वाइल्ड कार्डद्वारे एन्ट्री झाल्यानंतर खेळात मोठा ट्वीस्ट आला होता. याचदरम्यान घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक असलेल्या तेजस्विनी लोणारीला हाताला झालेल्या दुखापतीमुळे खेळ सोडावा लागला. तेजस्विनीला घरातून निरोप देताना सदस्यही भावूक झालेले पाहायला मिळाले.

‘बिग बॉस’च्या घरात पक्के मित्रही शत्रू होतात. असंच काहीसं अमृता धोंगडे व तेजस्विनी लोणारीच्या बाबतीतही घडलं. तेजस्विनी व अमृता यांची घरात गट्टी जमली. त्यानंतर त्या चांगल्या मैत्रिणी बनल्या. परंतु, गेल्याच आठवड्यात मतभेद झाल्याने त्यांच्यातील मैत्रीत फूट पडल्याचं दिसून आलं होतं. तेजस्विनीबद्दल अमृता घरातील इतर सदस्यांकडे वाईट बोलत असल्याचं प्रेक्षकांनीही पाहिलं. यावरुन महेश मांजरेकरांनीही चावडीमध्ये अमृताची कानउघडणीही केली होती.

हेही वाचा>> Video: अभिमानास्पद! ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा, ‘जय हिंद’ म्हणताच…

तेजस्विनी घरातून बाहेर पडल्यानंतर अमृता धोंगडेही भावूक झाली होती. त्यानंतर अमृताच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तेजस्विनी व तिचा एक व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “ही दोस्ती तुटायची नाय” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी अमृताला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> “निधड्या छातीवरती हे, शिवतेज तळपते” मराठीमध्ये नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा, ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत

हेही पाहा>> Photos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृता धोंगडेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. “तिला एवढं बदनाम करुन आता तुला वाईट वाटतंय”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर दुसऱ्याने “जेव्हा ती तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होती. तेव्हा तू तिच्यापासून लांब जात होतीस. तुला तिची मैत्री व प्रेम नको होतं. तिला किरण मानेंनी एक नंबर दिला त्याचाही तुला त्रास झाला. मग आता रडून काय फायदा”, असं म्हटलं आहे. “ती बाहेर जावी ही तुझीच इच्छा होती, म्हणूनच असं झालं”, अशी कमेंटही एकाने केली आहे.