‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून विकास सावंत घराघरात पोहोचला. छोटा पॅकेट बडा धमाका असलेल्या विकासने ‘बिग बॉस’च्या घरात प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. सुरुवातीला शांत असलेल्या विकासने खेळात आक्रमकता दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

विकास हा एक उत्तम डान्सर आहे. टॅलेन्टच्या जोरावर त्याने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. विकास सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्याने एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. रितेश देशमुखच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेड या चित्रपटातील गाण्यावर विकासने रील बनवला आहे.

हेही वाचा>>भर कार्यक्रमात उर्वशी रौतेलाला प्रेक्षकांनी रिषभ पंतच्या नावाने चिडवलं, अभिनेत्रीने बोलणं थांबवलं अन्…; पाहा व्हिडीओ

रितेश देशमुखच्या ‘वेड’ या गाण्यावर विकास डान्स करताना व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ‘वेड’ गाण्याची हूक स्टेप करत त्याच्या ग्रुपबरोबर रील बनवला आहे. विकासने शेअर केलेला हा रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विकासच्या या व्हिडीओने चाहत्यांनाही वेड लावलं आहे. त्याच्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. एकाने कमेंट करत “कुणी अपूर्वाने वेड लावलंय का?”, असा प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा>> ‘RRR’ला पुरस्कार मिळाल्यानंतर ‘तेलुगू ध्वज’चा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचं ट्वीट; अदनान सामी म्हणाला…

हेही वाचा>> Video: ‘Just Married’, लग्नानंतर राखी सावंतच्या रिसेप्शनचा व्हिडीओ समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
vikas sawant reel video

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच या चित्रपटाने कोटींची कमाई करायला सुरुवात केली. अजूनही रितेश देशमुख-जिनिलीयाच्या या चित्रपटाचं वेड प्रेक्षकांवर कायम आहे.