scorecardresearch

“मला विजेता…”, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच प्रसाद जवादेचं मोठं वक्तव्य

Bigg Boss Marathi 4: घरातून बाहेर पडताच प्रसाद जवादेने केलेलं वक्तव्य चर्चेत

“मला विजेता…”, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच प्रसाद जवादेचं मोठं वक्तव्य
प्रसाद जवादेचं वक्तव्य चर्चेत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी एक असलेल्या प्रसाद जवादेने रविवारी खेळातून एक्झिट घेतली. प्रसादचा घरातील प्रवास संपुष्टात आला. प्रसादला नॉमिनेट केल्यामुळे प्रेक्षकही नाराज आहेत.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर प्रसादने ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. प्रसाद म्हणाला, “गेली अनेक वर्ष मी मनोरंजन विश्वापासून दूर होतो. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर मला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. मला या सगळ्याची सवय नव्हती. पण माझ्या कष्टाचं चीज झाल्याने मी आनंदी आहे. बिग बॉस मराठीमुळे मला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. कलाविश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मी या क्षेत्रात पाऊल टाकलं. मी आतापर्यंत जे काही मिळवलं आहे ते माझ्या मेहनतीने कमावलं आहे”.

हेही वाचा>> Video: बिग बॉसने दिलेलं सरप्राइज पाहून राखी सावंत रडली, चाहते म्हणतात “हिच्या नादात प्रसादला…”

हेही वाचा>> “माझी प्रेग्नन्सी अनपेक्षित होती, त्यामुळे…”, आलिया भट्टचं गरोदरपणाबाबत मोठं वक्तव्य

“प्रेक्षकांच्या नजरेत मी ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता आहे, ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. माझी इतक्या वर्षांची मेहनत आज फळाला आली. बाहेर आल्यानंतर मी माझ्या एलिमिनेशनचा एपिसोड पाहिला. मी स्टेजवर येताच बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवरचा कॅमेरा माझ्याकडे वळला. ते पाहून ट्रॉफी फक्त काहीच स्टेप दूर होती, हे मला जाणवलं. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. मला कोणाबद्दलही तक्रार करायची नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आहेत”, असंही प्रसाद म्हणाला.

हेही वाचा>> “जवळ येऊ नकोस…”, रितेश देशमुखशी फोनवर बोलत असताना जिनिलीयाबरोबर नेमकं काय घडलं?

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात आणखी एक सदस्याचा प्रवास संपुष्टात येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीसाठी टॉप ५ दावेदार असणार आहेत. येत्या ८ जानेवारीला या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 19:48 IST

संबंधित बातम्या