छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बिग बॉसचे चौथे पर्व चांगलेच गाजताना दिसत आहे. बिग बॉसचे चौथे पर्व सुरु झाल्यापासून त्यात नवनवे ट्विस्ट, स्पर्धकांमध्ये होणारी भांडणं, त्यांच्या खेळी पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. बिग बॉसच्या चौथ्या पर्वात वादग्रस्त आणि सातत्याने चर्चेत असलेले अभिनेते किरण माने सहभागी झाले. या पर्वात सहभागी झाल्यापासून ते कायमच विविध कारणांमुळे चर्चेत राहिले. मात्र आता पहिल्याच एलिमेशन राऊंडमध्ये ते घराबाहेर होणार असल्याचे बोललं जात आहे.

मुलगी झाली हो या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते किरण माने हे बिग बॉसच्या घरात सहभागी झाले. या घरात सहभागी झाल्यापासून त्यांनी जोरदार टोलेबाजी सुरु केली होती. मात्र नुकतंच या पर्वातील पहिल्या एलिमेशन राऊंडचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रोमोत तीन नाव जाहीर करण्या आल्याचे दिसत आहे. यात यशश्री मसूरकर, किरण माने आणि अमृता देशमुख या तिघांना नॉमिनेट करण्यात आले. यावेळी महेश मांजरेकर म्हणाले, घरातील सदस्य या तिघांमधील कोणता स्पर्धक बाहेर जाईल, हे ठरवणार आहे.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : ‘शेवंता’, किरण माने अन् ‘मिसेस मुख्यमंत्री’…, ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी होणाऱ्या कलाकारांची संपूर्ण यादी

यानंतर अपूर्वा नेमळेकर, रोहित शिंदे ते अगदी कॅप्टन झालेल्या समृद्धी जाधव हिच्यासह सर्व सदस्यांनी किरण माने हे नाव जाहीर केलं. यानंतर महेश मांजरेकर म्हणाले की समृद्धीने आठवडाभर बाबा बाबा केलं आणि आता बाबालाच बाहेर काढलं. यानंतर किरण माने हे त्यांच्या नावाची पाटी घेऊन रडत कॅमेऱ्यासमोर उभे असल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान किरण माने हे घराबाहेर पडणार का? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण हा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांसह अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. किरण माने यांना त्याच्या मूळ रूपात आणण्यासाठी बिग बॉस गेम करतंय. उद्या पासून किरण माने असतील फायर मध्ये, अशी कमेंट एका युझरने केली आहे. तर एकाने पहिल्या आठवड्यात एलिमेशन नसतं अशी कमेंट केली आहे.