Bigg Boss Marathi 5 वे पर्व सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. बिग बॉसने दिलेल्या टास्कमुळे सदस्यांमध्ये होणाऱ्या वाद किंवा भांडणांमुळे तर कधी भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांची ‘शाळा’ घेतल्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. मात्र, आता घरातील सदस्य वर्षा उसगांवकरांच्या खेळाबद्दल बोलत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘कलर्स मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, पंढरीनाथ कांबळे व अंकिता वालावलकर एकत्र बसले आहेत. तर, दुसरीकडे अरबाज पटेल, निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर एकत्र बसले आहेत.

काय म्हणला पंढरीनाथ कांबळे?

वर्षा उसगांवकर या निक्की आणि अरबाजबरोबर बोलत असलेल्या पाहून पंढरीनाथ कांबळे म्हणतो, “ताईंचा कधी कधी भरवसा वाटत नाही.” त्यावर अभिजीत म्हणतो, “सगळ्यात भारी, स्वतंत्र खेळ कोणाचा असेल, तर तो ताईंचा आहे.” पंढरीनाथ म्हणतो, “ताईला फिरवणार हे असं करून, गुंतवणार ते”, त्याच्या या बोलण्यावर अभिजीत म्हणतो, “ते ताईला नाही गुंतवणार, ताई गुंतवते बरोबर.” पंढरीनाथ विचारतो, “आपल्याला?” त्यावर अभिजीत, मग काय, असे म्हणताना दिसत आहे. पंढरीनाथ म्हणतो, “तू वेडा आहेस?” अभिजीत त्याला म्हणतो, “जर तुमचं ओपन नॉमिनेशन असतं, तर तुम्ही ताईंचं नाव घेतलं असतं?” अंकिता म्हणते, “त्या आपलं घेऊ शकतात नाव.” अभिजीत म्हणतो, “त्या घेऊ शकतात नाव; पण आपल्या ग्रुपमधलं त्यांचं नाव कोणी घेत नाही आणि त्यांच्या ग्रुपमधलंदेखील त्यांचं नाव कोणी घेत नाही.”

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

वर्षा उसगांवकर निक्की आणि अरबाज यांच्याबरोबर बोलताना म्हणतात, “त्यांचं काय आहे, त्यांचा एकमेकांना पाठिंबा आहे. ते एकमेकांवर अवलंबून आहेत.” त्यांच्या या बोलण्यावर निक्की आणि अरबाज सहमती दर्शविताना दिसत आहेत. निक्की म्हणते, “आपण कसे वैयक्तिक, एकेकटे, स्वतंत्र खेळतोय.” त्यावर वर्षाताई म्हणतात, “मी तर पूर्णपणे स्वतंत्र खेळते.”

हेही वाचा: Video : फिल्मी डायलॉग, हुबेहूब हसणं अन्…; अभिजीतने केली शाहरुख खानची मिमिक्री! सूरज म्हणाला…

हा व्हिडीओ शेअर करताना कलर्स मराठीने, ‘घरात चर्चा चालू आहे भारी, वर्षाताईंचा गेम आहे लय भारी’, अशी कॅप्शन दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘जंगलराज’ टास्कमध्ये हरल्यानंतर निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल व वर्षा उसगांवकर हे पाच स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. आता या आठवड्यात घरात कोणता कल्ला होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.