‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सध्या गाजताना दिसत आहे. बिग बॉस( Bigg Boss Marathi)च्या घरात दररोज नवनवीन टास्क होताना दिसत असून प्रत्येक स्पर्धकाची वेगळी झलक पाहायला मिळत आहे. आता घन:श्याम म्हणजेच छोटा पुढारी आपल्या वेगळ्या अंदाजामुळे सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

काय म्हणाला छोटा पुढारी?

‘कलर्स मराठी’ने बिग बॉसचा एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये घन:श्याम निक्की तांबोळीला तू कसेही वाग, पण मी प्रेमानेच वागणार असे म्हणताना दिसत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये, निक्की तांबोळी त्याला विचारते की, तू जेवलास? तुझं पोट भरलं? त्यावर घन:श्याम, “तुझं प्रेम मिळालं तर पोट भरल्यासारखं वाटतं”, असे म्हणताना दिसत आहे. आणखी एका दृश्यात तो निक्कीला, “तू माझ्याशी कशीही वाग, पण मी प्रेमानेच वागणार” असे म्हणताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यातील मैत्री फुलताना दिसत आहे. या प्रोमोच्या पार्श्वभूमीला ‘आई मला खेळायला जायचंय’ हे गाणं ऐकायला मिळत आहे. हा प्रोमो शेअर करताना ‘कलर्स मराठी’ने त्याच्याशी कसेही वागा, पण छोटा पुढारी मात्र सगळ्यांशी प्रेमानेच वागणार! असे लिहिले आहे.

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

याआधी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता आणि घन:श्याममध्ये घरातील कामाच्या जबाबदारीवरुन वाद झाल्याचा पाहायला मिळाले होते. गेल्या रविवारी जेव्हा घरात फ्रेंडशीप डे साजरा केला होता, त्यावेळी योगिताकडून त्याला डबल धोलकीचे लॉकेट देण्यात आले होते. आता निक्की बरोबरची त्याची मैत्री कशी असणार, हे पाहायला प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील डिलीट केलेले सीन सोशल मीडियावर व्हायरल! नेटकरी म्हणाले, “यासाठी माफी…”

याबरोबरच बिग बॉसच्या घरात डान्स टास्क होणार असल्याचे वेगवेगळ्या प्रोमोमधून समोर आले आहे. त्यामध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज यांच्या डान्सची चर्चादेखील होताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात आता प्रेमाची नातीदेखील तयार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशाल आणि इरिनामधील जवळीक पाहून आर्या रडल्याचे एका प्रोमोमधून समोर आले आहे. आता प्रेमाचा हा लव्ह ट्रँगल खेळात नवीन कोणते वळण आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बिग बॉसच्या या पर्वात १६ स्पर्धक सहभागी झाले होते. पहिल्याच आठवड्यात कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांनी घराचा निरोप घेतला. आता या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी निक्की तांबोळी, घन:श्याम चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, निखिल दामले, सूरज, योगिता चव्हाण हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता या आठवड्यात बिग बॉसच्या घराला कोणता सदस्य निरोप देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.