Bigg Boss हा असा शो आहे, जो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी सदस्यांच्या वक्तव्यामुळे, कधी त्यांच्यातील भांडणामुळे, कधी बिग बॉसने दिलेल्या टास्कमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. त्याबरोबरच घरात जे सदस्य असतात, त्यांचा खेळ, त्यांचे वागणे यांवर बाहेरील जगातील कलाकार, प्रेक्षकदेखील आपले मत मांडत असतात. आता बिग बॉसच्या पहिल्या पर्वात सामील झालेली अभिनेत्री आरती सोळंकीने एका मुलाखतीदरम्यान सूरज चव्हाणविषयी आपले मत मांडले आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

‘अल्ट्रा बझ मराठी’ या यूट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत सूरज चव्हाणला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. तुला काय वाटतं, टॉप ३ मध्ये तो असेल का? त्यावर बोलताना आरतीने म्हटले, “जे चांगले खेळत आहेत, तेच टॉप ३ मध्ये दिसावेत. सूरज चव्हाणला सगळे जण तो गरीब परिस्थितीतून आला आहे, या कारणामुळे पाठिंबा देतात. पण, ज्याला हा खेळ समजला, जो हा खेळ खेळणार आहे, तो जिंकावा.”

“जर सूरज खेळ खेळलाच नाही आणि फक्त सहानुभूतीच्या आधारावर बिग बॉसची ट्रॉफी घेऊन गेला, तर पुढचा सीझन मी बघणार नाही. मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की, या शोमुळे त्याची लोकप्रियता दुप्पट व्हावी. त्याला जास्त मानधन मिळावे; पण न खेळता सूरज जिंकला नाही पाहिजे”, असे वक्तव्य आरती सोळंकीने केले आहे.

हेही वाचा: “आपल्या समाजात जातीयवाद…”; ‘स्त्री २’ फेम अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “एकाच विहिरीतून पाणी पिण्याची…”

याबरोबरच या सीझनमधील अनेक गोष्टींवर आरतीने वक्तव्य केले आहे. निक्कीला गेम माहितेय, कसे खेळायचे ते माहितेय. कारण- ती आधीदेखील बिग बॉसमध्ये जाऊन आली आहे. कोणत्या गोष्टींमुळे ती चर्चेत राहू शकते, हे तिला माहिती आहे. महाराष्ट्रात कोणतेही योगदान नसलेल्या इरिनाला मराठी बिग बॉसमध्ये घेणे मला पटले नाही. असेही अभिनेत्रीने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील तीन आठवडे पूर्ण झाले असून, चौथ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. या पर्वात १६ स्पर्धक सहभागी झाले होते. पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील यांनी घराला निरोप दिला; तर तिसऱ्या आठवड्यात योगिता चव्हाण व निखिल दामले या दोन सदस्यांनी घराला निरोप दिला आहे. आता या आठवड्यात घरात काय बदल होणार आणि कोणती समीकरणे दिसणार, कोणते सदस्य प्रेक्षकांची मने जिंकून घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.