Bigg Boss Marathi 5 हे पर्व सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. या पर्वातील तीन आठवडे पूर्ण झाले असून, आता स्पर्धकांनी आपला खेळ खेळायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. या स्पर्धकांचा खेळ, त्यांचे वागणे-बोलणे यांवर सोशल मीडियावर नेटकरी व्यक्त होताना दिसतात. कधी चांगल्या खेळणाऱ्या स्पर्धकांना ते पाठिंबा देतात; तर कधी चुकीचे वागणाऱ्या सदस्यांना ट्रोलदेखील करतात. आता नेटकऱ्यांनी वैभव चव्हाण(Vaibhav Chavan)ला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले.

‘कलर्स मराठी’ने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर शेअर केला होता. हा व्हिडीओ भाऊचा धक्का या एपिसोडनंतरचा आहे. भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुखने वैभव चव्हाणला टीमबरोबर धोका केला, गद्दारी केली, असे म्हणत, त्याची कानउघाडणी केली होती. त्याबरोबरच आम्ही घरात वैभव चव्हाणला पाठवले आहे; गद्दार म्हणून बाहेर येऊ नका, असे म्हटले होते. आता या एपिसोडनंतर इरिनाबरोबर तो गार्डन परिसरात बसला आहे. त्यावेळी इरिना त्याला रितेश देशमुखने बोललेल्या गोष्टीबाबत विचारते. तेव्हा तो म्हणतो, “ते एवढं काही बोलले नाहीत. मला माहीत होतं की हे होणार आहे. त्यामुळे मला फार काही वाईट वाटलं नाही. अरबाज काही बोलला नाही.”

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

जान्हवी मला म्हणत होती, “तू इरिनासोबत आहेस. मी तिला सांगितलं की, इरिनालादेखील कॅप्टन बनायचं आहे आणि मी तिच्यासाठी लढेन.” त्यावर इरिनानं सावध राहा, असं म्हटलं आहे.

काय म्हणाले नेटकरी?

आता नेटकरी वैभव चव्हाणला मोठ्या प्रमाणात ट्रोल करीत असल्याचे पाहायला मिळत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “हा शेवटपर्यंत अरबाजला घाबरणार आहे म्हणून त्याच्याच खाली राहील आणि म्हणे हा रांगडा गडी, बस झालं याचा खेळ संपवा. आता हा खेळात नकोय.” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “अरे, तुला लाज वाटते का? संपूर्ण महाराष्ट्र बोलतोय आणि तू म्हणतोस काही नाही.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “निखिल आणि योगितापेक्षा हा घराबाहेर यायला हवा होता. ते विश्वासू होते आणि शेवटच्या आठवड्यात चांगले खेळले”, असे म्हणत नेटकऱ्यांनी वैभव चव्हाणवर टीका केली आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi : निक्कीच्या निर्णयामुळे ‘ए’ टीममध्ये पडली फूट, वैभव-घनःश्यामने उठवला आवाज, म्हणाले, “हिच्या वागण्यामुळे टीमचा घात”

दरम्यान, बिग बॉसच्या घरातून तिसऱ्या आठवड्यात दोन सदस्यांनी निरोप घेतला. योगिता चव्हाण आणि निखिल दामले या दोघांनी तिसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. आता या आठवड्यात खेळात आणखी काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.