Bigg Boss Marathi Aaroh Velankar forgot his wedding date | Loksatta

आरोह वेलणकर विसरला स्वतःच्याच लग्नाची तारीख; म्हणाला,”लग्नानंतर दिवस…”

अभिनेता आरोह वेलणकर सध्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात दिसतोय. घरात स्पर्धकांशी गप्पा मारताना तो तो आपल्या लग्नाच्या तारखेत गोंधळला असल्याचं पाहायला मिळतं.

आरोह वेलणकर विसरला स्वतःच्याच लग्नाची तारीख; म्हणाला,”लग्नानंतर दिवस…”
(फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत सौरभची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता आरोह वेलणकर सध्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात दिसतोय. आरोहने २०१७ मध्ये मैत्रीण अंकिता शिंगवीशी लग्नगाठ बांधली होती, त्याच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांशी गप्पा मारताना तो त्याच्या लग्नाची तारीख सांगतो, पण त्याचा दोन तारखांमध्ये गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतं.

घरातील सर्व स्पर्धक चावडीसाठी बसले असताना स्नेहलता वसईकर तिच्या लग्नाच्या वाढदिवसाचा उल्लेख करते. १३ डिसेंबरला लग्नाचा वाढदिवस असल्याचं स्नेहलता सांगते. त्यानंतर आरोह म्हणतो, “माझी ११ला  अॅनिव्हर्सरी असते. त्यावेळी राखी त्याला ‘डिसेंबर?’ असं विचारते. तेव्हा आरोह म्हणतो बहुतेक ११ लाच असते.” मग तो थोडा आणखी विचार करतो आणि १० की ११ असं बोलतो. तेव्हा घरातील सर्व स्पर्धक त्याच्याकडे पाहून हसू लागतात. त्यानंतर तो ११ डिसेंबरलाच त्याच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचं सांगतो.

पुढे आरोह म्हणतो, “यावर्षी जवळपास १०-१२ वर्षांनी माझी चुलत भावंड अमेरिकेहून येणार होती आणि आमची १५ दिवसांची फॅमिली ट्रीप ठरली होती. त्यामुळे त्याच दिवसांत मी हा शो करावा की नाही, याचा विचार करत होतो. आता ते सगळे एंजॉय करत असतील आणि माझी जागा सगळीकडे रिकामी असेल. पण जाऊदेत, आता पुढच्या वर्षी मीच अमेरिकेला जाईन. प्रत्येक वेळी काही ना काही कारणांमुळे माझं असंच होतं,” असं आरोह म्हणतो.

‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून ‘हे’ वाईल्ड कार्ड स्पर्धक बाहेर; नेमकं कारण काय?

त्यानंतर मीरा जगन्नाथ बोलू लागते. “माझ्या वाढदिवसाला दर वेळी काही ना काही होतं आणि मी खूप रडते. कधीच काही चांगलं होतं नाही. सतरा खतरा असं ती म्हणते,” मग राखी तिला वाढदिवस विचारते, तेव्हा ती १७ म्हणते आणि राखी यादिवशी आपल्या एक्स-बॉयफ्रेंडचा वाढदिवस असायचा असं सांगते.

पुन्हा आरोह बोलू लागतो, “मला कधी वाटलं नव्हतं की मी लग्न करेन. मुलगा आहे मला. लग्न केल्यानंतर दिवस किती वेगाने जातात, लग्नाचा पाच वर्ष झाली आहेत,” असं तो म्हणतो. त्यानंतर किरण माने त्यांच्या लग्नाला २३ वर्षे झाल्याचं सांगतात.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 13:03 IST
Next Story
“मी त्याची…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारासाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट