Bigg Boss Marathi Abhijeet Sawant : ‘बिग बॉस मराठी’च्या विजेतेपदावर यंदा सूरज चव्हाणने तर, उपविजेतेपदावर लोकप्रिय गायक अभिजीत सावंतने आपलं नाव कोरलं. आपल्या संयमी आणि शांत स्वभावाने गायकाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. अभिजीत जिंकावा अशी अनेकांची इच्छा होती. पण, सूरजला सर्वाधिक मतं मिळाल्याने तो विजयी झाला. आपला प्रतिस्पर्धी विजेता झाल्यावर देखील अभिजीतने तेवढ्याच दिलखुलासपणे मंचावर त्याचं अभिनंदन केलं.

हेही वाचा : “भावा एकदम झापुक झुपूक…”, Bigg Boss ने घराबाहेर काढलेल्या आर्याची सूरजसाठी पहिली पोस्ट! ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…

अभिजीत सावंत अंकिताबरोबरच्या मैत्रीबद्दल काय म्हणाला?

बिग बॉसच्या घराबाहेर ( Bigg Boss Marathi ) आल्यावर अभिजीतने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. ‘अल्ट्रा बझ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीतने अंकिताबद्दलच्या मैत्रीविषयी भाष्य केलं आहे. तो नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात…

“बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर अंकिता आणि निक्कीबरोबरची मैत्री कायम राहणार का?” हा प्रश्न विचारल्यावर अभिजीत म्हणाला, “मला खरंच माहिती नाही की, यापुढे माझे कसे मित्र होतील. खरंतर, त्या दोघीही सारख्याच व्यक्तिमत्त्वाच्या आहेत. त्यांना जे बरोबर वाटतं…तेच त्या दोघीपण वागायच्या. दोघीपण चुका करायच्या. शेवटी आता सीझन संपताना निक्की माझी चांगली मैत्रीण झाली होती. तर, दुसरीकडे घरातून बाहेर पडताना आता शेवटी-शेवटी अंकिताबरोबर माझी तशी अटॅचमेंट राहिली नाही.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi पॅडी दादांच्या हातात ट्रॉफी दिली, मिठी मारली अन्…; सूरज-पंढरीनाथचे ‘ते’ फोटो पाहून नेटकरी भावुक, म्हणाले, “दोन खरी माणसं…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi – अभिजीत सावंत

हेही वाचा : Singham Again : रामायणाशी खास कनेक्शन ते खलनायकाचा जबरदस्त अंदाज! ५ मिनिटांचा ट्रेलर पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काहीजण असे असतात जे खूप जास्त विचार करतात आणि स्वत:चं एक मत तयार करतात आणि हेच लोक इतरांसाठी जास्त घातक ठरतात अशा लोकांपासून मी जरा दूर राहतो. त्यामुळे अंकिताबरोबर आता फक्त ओळख-पाळख राहील. पण, आता तिच्याबरोबर मैत्री (फ्रेंडशिप) होणार नाही.” असं स्पष्ट मत यावेळी अभिजीत सावंतने ( Bigg Boss Marathi ) मांडलं आहे.