‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून सई लोकूर ही तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. सई लोकूर ही आई झाली आहे. सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

सई लोकूरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो शेअर केला आहे. यात तिने तिला मुलगी झाल्याचे सांगितले आहे.
आणखी वाचा : Video: ‘नवा गडी नवं राज्य’ २३ डिसेंबरला घेणार प्रेक्षकांचा निरोप; शूटिंगचा शेवटचा दिवस कलाकारांनी ‘असा’ केला साजरा

“आम्हाला मुलगी झाली आहे. तिचा जन्म १७ डिसेंबर २०२३ रोजी झाला. ती खूप सुदृढ, सुंदर आहे. आम्हाला या काळात मिळालेला पाठिंबा आणि आशीर्वादासाठी तुमचे खूप खूप आभार”, असे सईने म्हटले आहे.

सईने ही पोस्ट शेअर करताना छान कॅप्शनही दिले आहे. “आम्हाला हे सांगताना फार आनंद होतोय की, आम्हाला मुलगी झाली आहे. आई आणि बाळ दोघे सुखरुप आहेत. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद”, असे सईने म्हटले आहे.

आणखी वाचा : आदिनाथ कोठारेला ‘या’ गोष्टीची वाटते भीती; लक्ष्मीकांत बेर्डेंचा उल्लेख करीत म्हणाला, “त्यांच्यामुळेच मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सईने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.