छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व चांगलेच गाजले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक कलाकारांनी हा कार्यक्रम दणाणून सोडला. या कार्यक्रमात ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता धोंगडे सहभागी झाली होती. या कार्यक्रमामुळे तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. आता अमृता धोंगडे लवकरच लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. तिने स्वत: मुलगा पसंत केल्याची माहिती दिली आहे.

अमृता धोंगडे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती तिच्या चाहत्यांना वेळोवेळी उत्तर देताना दिसत असते. नुकतंच अमृता धोंगडला एका छोट्या चाहत्याने व्हिडीओ शेअर करत थेट लग्नाची मागणी घातली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी त्याने अमृता धोंगडेला लग्न करणार का? असा प्रश्न विचारला होता.
आणखी वाचा : “भेटण्याची इच्छा नसलेल्या…” अपूर्वा नेमळेकरबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर अमृता धोंगडे स्पष्टच बोलली

तिच्या या छोट्या चाहत्याचा व्हिडीओ पाहून अमृताही भारावली. तिने त्याच्या लग्नाच्या प्रस्तावावर होकार सांगत देत मुलगा पसंत असल्याचे सांगितले आहे. “किती गोड, मुलगा पसंत आहे बरं का, तयारीला लागा”, अशी कमेंट अमृताने केली आहे.

अमृताने दिलेल्या या उत्तरावर त्या छोट्या चाहत्यानेही कमेंट केली आहे. “हो हो जुळल तर मग, पुढील बोलणीसाठी आम्ही तयार आहोत. तुमच्या उत्तरासाठी आणि या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. प्रयन हा तुमचा मोठा चाहता आहे. देवाचे तुम्हाला कायमच यश देवो”, असे कमेंट त्यांनी केली आहे.

अमृताने केलेली ही कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्या दोघांच्या संभाषणाचे अनेक फोटोही सध्या व्हायरल होताना दिसत आहे. ‘प्रयण टेल्स’ नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

amruta dhongade comment

आणखी वाचा : “विराजसशी लग्न झाल्यावर…” शिवानी रांगोळे सासूला कोणत्या नावाने हाक मारते? स्वत:च केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अमृता धोंगडेने झी मराठी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेत तिने सुमी हे पात्र साकारले होते. या मालिकेतील सुमीचा अंदाज रसिकांना चांगलाच पसंत पडला होता. अमृता धोंगडेने अनेक मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. काही दिवसांपूर्वी ती बिग बॉस मराठी या कार्यक्रमातही सहभागी झाली होती.