Bigg Boss Marathi Arbaz Patel Elimination : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचं धक्कादायक एलिमिनेशन नुकतंच पार पडलं आहे. घरातून आठव्या आठवड्यात अरबाज पटेलने एक्झिट घेतली आहे. घरात नॉमिनेट असलेल्या सदस्यांपेक्षा सर्वात कमी मतं मिळाल्याने त्याला ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे.

गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात ‘जंगलराज’ ही थीम होती. या ‘जंगलराज’ थीममध्ये ‘शिकाऱ्याची बंदूक’ हे नॉमिनेशन कार्य पार पडलं होतं. या कार्यात अरबाज, जान्हवी, वर्षा, निक्की, सूरज असे पाच सदस्य घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. यांच्यामध्ये सर्वात कमी व्होट्स मिळाल्याने अरबाजला ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घ्यावी लागली आहे. अरबाज एलिमिनेट झाल्याचं जाहीर होताच निक्की ढसाढसा रडू लागल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक! ‘कलर्स मराठी’वर सुरू होणार नवीन मालिका, पाहा पहिला प्रोमो

यंदा ‘भाऊच्या धक्का’ नसल्याने एलिमिनेशनसाठी ‘बिग बॉस’च्या टीमने सर्व सदस्यांना अ‍ॅक्टिव्हिटी रुममध्ये बोलावलं होतं. प्रत्येकाचं नाव लिहिलेल्या बॅगमध्ये संबंधित सदस्य सेफ आहे की, डेंजर झोनमध्ये याच्या पाट्या ठेवण्यात आल्या होत्या. जान्हवी, सूरज आणि वर्षा हे तिघेही सेफ होऊन शेवटी डेंजर झोनमध्ये निक्की आणि अरबाज राहिले होते. यावेळी ‘बिग बॉस’कडून अरबाज एलिमिनेट झाल्याचं सांगण्यात आलं आणि निक्की घरात प्रचंड रडू लागली.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : बिग बॉसच्या घरात रंगला चुरशीचा खेळ; स्वप्नील जोशी आणि सुप्रिया पिळगांवकर यांचे स्पर्धकांना प्रोत्साहन; पाहा व्हिडीओ

अरबाजने ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेताना त्याच्या म्युचुअल फंडमधले सर्व २०० कॉइन्स निक्कीला दिले. याशिवाय घरात कॅप्टन झालेला सदस्य पहिल्यांदाच एलिमिनेट झाल्याची घटना ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात घडली आहे. अरबाज पटेलला आठव्या आठवड्यात घराचा कॅप्टन होण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे “अरबाज घराबाहेर झाल्यास ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) इतिहासात पहिल्यांदाच कॅप्टन असलेला सदस्य घराबाहेर झाल्याची घटना घडेल” असं बिग बॉसने आधीच स्पष्ट केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता अरबाज घराबाहेर गेल्यावर निक्कीला घरात कोण आधार देणार, ती इथून पुढचा खेळ कसा खेळणार या सगळ्या गोष्टींकडे संपूर्ण महाराष्ट्रातचं लक्ष लागलेलं आहे. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’चा सीझन नेमका केव्हा संपणार हे सुद्धा सोमवारच्या भागात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.