Bigg Boss Marathi Dhananjay Powar : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून चौथ्या क्रमांकावर धनंजय पोवार एलिमिनेट झाला. त्याच्या एव्हिक्शननंतर डीपीचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून धनंजयला भरभरून वोटिंग करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांसाठी त्याने चौथ्या क्रमांकावर एक्झिट घेणं धक्कादायक होतं. अखेर या सगळ्यावर धनंजयने आपली पहिली प्रतिक्रिया व्हिडीओ शेअर करत दिली आहे.

धनंजय ( Bigg Boss Marathi ) म्हणाला, “नमस्कार मी धनंजय पोवार, तुम्हा सर्वांचा लाडका डीपी… तुम्ही ‘बिग बॉस’च्या सीझनमध्ये मला चौथ्या क्रमांकावर पोहोचवलं… त्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले त्यासाठी मी तुमचा मनापासून आभारी आहे. खरंच तुमचे कसे आभार मानावे हे मला कळत नाहीये. माझ्यावर लोक एवढं प्रेम करतील हे मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मी जो होतो…जसा होतो तसाच मी शोमध्ये सर्वांना दिसलो. माझ्या भावना शोमध्ये देखील खरेपणाने मी व्यक्त केल्या आणि हा व्हिडीओ मी खास तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी शेअर करतोय.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “एका ग्रेट माणसाची…”, रितेशला मिठी मारत केदार शिंदेंची खास पोस्ट! तर, सूरज चव्हाणसाठी केली मोठी घोषणा

वडिलांच्या नजरेत माझी किंमत वाढली – डीपी

डीपी पुढे म्हणाला, “ज्या ज्या लोकांनी मला वोट केलं आणि ज्यांनी मला जास्तीत जास्त वोटिंग व्हावं यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे खूप खूप आभार! तुम्ही माझ्यावर दाखवलेलं प्रेम पाहून या क्षणाला मन भरून येतंय. रात्रीपासून मी अनेक गोष्टी ऐकतोय…माझ्या डोळ्यात आता खरंच पाणी येईल. मी शब्दात माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही. काही लोकांनी तर परदेशातून व्हिडीओ बनवलेत. गाणी बनवली…खूप खूप धन्यवाद!”

“ट्रॉफी मिळाली नाही याची एक खंत आहे पण, तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे वडिलांच्या नजरेत माझी किंमत खूप वाढली आहे. खरंच माझ्या जन्माचं सार्थक झालं आणि हे सार्थक मला आयुष्यभर जपावं लागेल. आय लव्ह यू महाराष्ट्र! कधीही नाही विसरणार तुमचे हे उपकार…जोतिबाच्या नावानं चांगभलं!” असं सांगत धनंजयने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5चा उपविजेता अभिजीत सावंतचा आज वाढदिवस, पत्नी व मुलींबरोबर ‘असं’ केलं सेलिब्रेशन, पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डीपी आपल्या भावना व्यक्त करताना प्रचंड भावुक झाला होता. नेटकऱ्यांनी त्याच्या या प्रतिक्रियावर लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडत “आमच्यासाठी खरे विजते तुम्ही आहात” असं म्हटलं आहे.