‘इंडियन आयडल’च्या पहिल्या पर्वाचा विजेता अभिजीत सावंत ‘बिग बॉस मराठी’मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ‘इंडियन आयडल’ जिंकल्यानंतर काही वर्षांनी अभिजीत सावंतच्या करिअरला उतरती कळा लागली होती. पण, अभिजीतने त्याच्या आवाजाने श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून ठेवलं आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात अभिजीत झळकल्यानंतर श्रोत्यांनी त्याच्यावर भरभरून प्रेम केलं. त्याला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा उपविजेता ठरवलं.

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपल्यापासून अभिजीत सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. आपल्या कामासह फोटो, व्हिडीओ शेअर करत आहे. नुकताच त्याने बाथरुममधील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे; जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video:…म्हणून अंकिता वालावलकरने सूरज चव्हाणची घेतली उशीरा भेट, म्हणाली, “पॅडी दादा…”

“शोच्या आधी अतिउत्साह…आणि बाथरुममध्ये सुंदर दिवे…तर मग नाच, गाणं व्हायलाच पाहिजे”, असं कॅप्शन लिहित अभिजीत सावंतने बाथरुममधील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, अभिजीत बाथरुममध्ये ‘अफगान जलेबी’ गाण्यावर वेगवेगळे हावभाव करत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम निखिल दामलेने खरेदी केली आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

अभिजीत सावंतच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अभिजीतसाठी बिग बॉस पुन्हा बघत आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “अभिलाषा मोड ऑन…खूप छान…आम्हाला तुमची आठवण येतेय.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आग लावलीस भावा.” चौथ्याने लिहिलं की, अफगान अभिलाषा

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिजीत सावंतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘बिग बॉस मराठी’नंतर तो हिंदी शोमध्ये पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. त्यानंतर दिवाळीत त्याचं नवीन गाणं ‘लाडकी बहीण’ हे प्रदर्शित झालं. याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ महाअंतिम सोहळ्यात अभिजीत पाहायला मिळणार आहे. शनिवार ९ आणि रविवार १० नोव्हेंबरला रात्री ९ वाजता हा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.