टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अर्जुन व सायलीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडतं आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मिरा जगन्नाथनं ही मालिका सोडल्याचं समोर आलं आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. मग ते अर्जुन, सायली असो किंवा प्रिया, अन्नपूर्णा आजी असो. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिनं ‘ठरलं तर मग’ या मालिकेत नकारात्मक पात्र साकारलं होतं. ‘साक्षी’ असं या पात्राचं नाव होतं. पण आता मीरानं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, तिच्या या अचानक एक्झिटमुळे चाहते मात्र नाराज झाले आहेत.

हेही वाचा – Bigg Boss OTT 2: मनीषा रानीला टार्गेट केल्यामुळे वडील प्रमोद कुमार यांनी सलमान खानविषयी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…

hdj

हेही वाचा – ‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’ म्हणतं सोनाली कुलकर्णीनं खास मैत्रिणीबरोबरचा डान्स व्हिडीओ केला शेअर

मीरा जगन्नाथच्या जागी आता अभिनेत्री केतकी पालव मालिकेत झळकली आहे. याआधी केतकीनं बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ती ‘आमने सामने’ या नाटकातही दिसली आहे.

फोटो साभार – हॉटस्टार

हेही वाचा – अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘सिंधुताई माझी माई’मध्ये दिसणार ‘या’ भूमिकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मागील आठवड्यात सुद्धा ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर होती. त्यानंतर ‘आई कुठे काय करते’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘रंग माझा वेगळा’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिका अनुक्रमे टॉप ५ मध्ये होत्या.