मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री या सध्या यशाच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत. काही कलाकार हे स्वत: च नवीन घर खरेदी करत आहेत, तर काही कलाकारांनी नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. आता या यादीत बिग बॉस मराठीमधील एक अभिनेत्रीही सहभागी झाली आहे. बिग बॉस मराठीमधील अभिनेत्री सई लोकूर हिने नवीन घर खरेदी केले आहे.
सई लोकूरने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सई लोकूर आणि तिचा पती तिर्थदीप रॉय एकत्र घरात गृहप्रवेश करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या नव्या घरात पूजा, होम-हवन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “पोरी मला इच्छामरणही चालेल, पण…” ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने ‘कोकण हार्टेड गर्ल’कडे मांडली व्यथा, अंकिता म्हणाली “मी सिनेसृष्टीपर्यंत…”
यावेळी सई आणि तिर्थदीप रॉय यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे आनंद दिसत आहे. सई आणि तिर्थदीप यांनी बंगळुरुमध्ये नवीन घर खरेदी केले आहे. त्यांनी त्यांच्या या घराची झलकही दाखवली आहे.
“नवीन सुरुवात, मला माझ्या पतीचा खूप अभिमान वाटतो”, असे कॅप्शन तिने दिले आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान सई लोकूरने ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धी अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.