Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस’मध्ये अनेक नाती तयार होतं असतात. कधी मैत्रीचं नातं, कधी भाऊ-बहिणीचं नातं, तर कधी प्रियकर-प्रेयसी हे नातं तयार होतं. ही नाती ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर टिकतात असं नाही. पण काही नाती प्रदीर्घ काळ टिकल्याची बरीच उदाहरण आहेत. असंच एक नातं ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पाहायला मिळालं. ते म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांचं नातं.

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरू झाल्यापासून निक्की आणि अरबाज यांची चांगलीच गट्टी जमली. त्यानंतर दोघांचं मैत्रीच नातं आणखी घट्ट झालं. पण मधल्या काळात दोघं दुरावले. तरीही काही काळानंतर दोघं पुन्हा एकत्र आले. त्यानंतर अरबाज घराबाहेर झाला. यावेळी निक्कीने फोडलेला टाहो सगळ्यांनीच पाहिला आहे. पण यानंतर एक ट्विस्ट आला. फॅमिली वीकमध्ये निक्कीच्या आईने तिला अरबाजचा साखरपुडा झाल्याचं सांगितलं. यामुळे निक्कीला धक्काच बसला. तिने अरबाज चॅप्टर बंद करायचं ठरवलं. पण तसं काही झालं नाही. ‘बिग बॉस मराठी’च्या अंतिम आठवड्यात दोघांमध्ये झालेले गैरसमज दूर झाले. आता ‘बिग बॉस’च्या घराबाहेरदेखील निक्की आणि अरबाज एकमेकांचा हातात हात घेऊन फिरताना दिसत आहेत. एवढंच नव्हेतर दोघं एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच आता निक्कीने अप्रत्यक्षरित्या प्रेमाची कबुली दिली आहे.

हेही वाचा – Video: शूट करत असताना अचानक प्रसिद्ध गायिकेवर पडला सेट अन् मग…; व्हिडीओ झाला व्हायरल

हेही वाचा –Bigg Boss 18 : पहिल्या नॉमिनेशन टास्कमध्ये झाला राडा, गुणरत्न सदावर्ते झाले टार्गेट; म्हणाले, “डंके की चोट पे…”

‘अल्ट्रा मराठी बझ’ या युट्यूब चॅनेलशी निक्की तांबोळीने नुकताच संवाद साधला. यावेळी अरबाजने हार्ट इमोजसह तिच्याबरोबर शेअर केलेल्या फोटोबद्दल तिला विचारलं. तेव्हा निक्की म्हणाली, “आमच्यामध्ये जे काही आहे. मग ते प्रेम असेल, काहीही असेल. ते सगळं काही उघडपणे आहे. आम्ही एकमेकांना लाइक करतो. तर ठीक आहे.”

हेही वाचा – सूरज चव्हाण जिंकल्यावर केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे अभिनेता झाला ट्रोल, म्हणाला, “आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांनी आधी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर तिला अरबाजचं एका शब्दात वर्णन करायला सांगितला. तेव्हा निक्की म्हणाली, “मी अ‍ॅक्शन करून दाखवते.” मग तिने लाजत हार्ट करून दाखवलं आणि म्हणाली, “हे प्रेम मैत्रीमध्ये पण असू शकतं ना. प्रत्येक मुलगा आणि मुलगी कपलच नसू शकतात. आमचं मैत्रीमधलं प्रेम आहे. जे खूप गहिर आहे.”