Shiv Thakare Home Caught In Fire : ‘बिग बॉस मराठी’ फेम शिव ठाकरेबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे त्याच्या मुंबईतल्या राहत्या घराला आग लागली आहे. सोशल मीडियावर त्याच्या घराला लागलेल्या आगीचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधून आगीमुळे शिव ठाकरेच्या घराचं नुकसान झाल्याचं दिसत आहे.

शिव ठाकरे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसतो. तसंच त्याचे आजी आणि कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अशातच त्याच्या मुंबईतल्या राहत्या घराला लागलेल्या आगीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विरल भयानी व टेली मसाला या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शिवच्या घराला लागलेल्या आगीचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. आज (१८ नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली. आता अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे. Kolte Patil Verve या बिल्डिंगमधील शिवच्या ठाकरेच्या घराला आग लागली आहे.

सुदैवाने या आगीत कुणाला काही इजा झालेली नाही. मात्र त्याच्या घराचं प्रचंड नुकसान झालं आहे. घरातील फर्निचरसह इतर काही सामान या आगीत जळलं आहे. या आगीच्या दुर्दैवी घटनेबद्दल अद्याप शिवची काही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

शिव ठाकरेच्या घराला लागलेल्या आगीचा व्हिडीओ

शिव ठाकरेबद्दल सांगायचं झाल्यास, ‘आपला माणूस’ म्हणून त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने विविध शोजद्वारे मराठीसह हिंदी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. शिवने ‘रोडीज’ या शोमध्ये सहभाग घेतला होता. नंतर तो ‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वातही झळकला होता. या पर्वाचा विजेता होता. त्यानंतर हिंदी ‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वाचेही उपविजेतेपद पटकावलं आहे.