‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. यंदाच्या आठवड्यात बिग बॉसने घरातील सदस्यांना बेडीत अडकवलं आहे. घरातील सदस्यांपैकी अपूर्वा नेमळेकर व विकास सावंत यांची जोडी बिग बॉसने बनवल्याने त्यांना हा संपूर्ण आठवडा घरात एकत्र वावर करायचा आहे.

‘बिग बॉस’च्या घरातील कॅप्टन्सी टास्क पार पडल्यानंतर ‘बीबी अवॉर्ड शो’चा कार्यक्रम होणार आहे. या अवॉर्ड सोहळ्यात घरातील सदस्य प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. तसेच घरातील सदस्यांना या सोहळ्यात वेगवेगळे अवॉर्डही दिले जाणार आहेत. याचा एक प्रोमो व्हिडीओ कलर्स मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> Video: “…हे मराठी माणसाचं वचन आहे”; शिव ठाकरेचे उद्गार ऐकताच रणविजयचे डोळे पाणावले, जुना व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस’च्या घरातील अवॉर्ड सोहळ्यात अपूर्वा नेमळेकर व विकास सावंत यांनी ‘उह लाला’ या विद्या बालनच्या गाण्यावर रोमॅंटिक डान्स केला. या डान्सची झलक व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. डान्स संपल्यानंतर किरण माने विकास व अपूर्वाच्या मध्ये जाऊन बसल्यानंतर अपुर्वाने लगेच नाक मुरडल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या अवॉर्ड सोहळ्यात अपूर्वा व विकास यांच्या जोडीला ‘सर्वोत्कृष्ट धमाल जोडी’ हा पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा>> ‘दृश्यम २’च्या भरघोस यशानंतर दिग्दर्शक चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या तयारीत, म्हणाला “कथा तयार आहे पण…”

हेही पाहा>> Photos: टेरेस, स्विमिंगपूल अन्…; अलिबागमधील गावात विराट कोहली बांधणार १३ कोटींचं घर, पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपूर्वा नेमळेकर व विकास सावंत ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी एक आहेत. आता ‘बिग बॉस’च्या घरात चार सदस्यांची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आता घरातील समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळणार आहे.