Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा त्याच्या करिअरवर बोट ठेवत अपमान केला होता. ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कदरम्यान सुरुवातीला निक्की पॅडीला ‘जोकर’ म्हणाली. तर, त्यानंतर जान्हवीने पुन्हा एकदा पातळी सोडून पंढरीनाथच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. यानंतर सर्वत्र जान्हवी विरोधात नाराज पसरली आहे. आपण केलेल्या चुकीची उपरती झाल्यावर जान्हवीने काल ढसाढसा रडत पंढरीनाथची माफी मागितली.

जान्हवीने पंढरीनाथची माफी मागितल्यावर पुन्हा एकदा मराठी कलाकार व्यक्त झाले आहेत. अनेकांनी जान्हवीने फक्त नाटक म्हणून माफी मागितल्याचं पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “तुझ्या खोट्या अश्रूंना तो Its Ok…”, जान्हवीने रडून माफी मागितल्यावर विशाखा सुभेदारने सुनावलं! म्हणाली, “पंढरीनाथ…”

यंदा ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री योगिता चव्हाणचा पती सौरभ चौघुलेने यासंदर्भात मोजक्या शब्दांत पोस्ट शेअर करत “डोळ्यात Glycerine तेवढं घ्यायचं राहिलं…” असं म्हटलं आहे. सौरभने पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलं नसलं तरीही त्याचा रोख कोणाकडे आहे हे लगेच लक्षात येतं.

अभिनेता उत्कर्ष शिंदे जान्हवीने माफी मागितल्यावर लिहितो, “आधी दुसऱ्यांच्या जीवावर उडायचं. मध्येच कोंबढीसारखं फडफडायचं मग गटार उघडून बडबडायचं आणि माती खाल्लीये हे कळालं की, मुळूमुळू रडायचं. कधी जाणार ही Ja Na Vhi” याशिवाय जय दुधाणेने, “वॉव जान्हवी किल्लेकर छान ओव्हर acting लवकर बाहेर या… पुरस्कार वाट बघतोय. तू पथेटिक आहेस” अशी प्रतिक्रिया पोस्ट शेअर करत दिली आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

हेही वाचा : Video : “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही”, जान्हवीकडून पंढरीनाथचा अपमान; आर्याने जाब विचारताच म्हणाली, “जा फूट…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

हेही वाचा : बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

जान्हवीने मागितली माफी

जान्हवी एकटीच गार्डनर एरियामध्ये रडत असते. धनंजय घडल्याप्रकाराबद्दल पॅडीला सांगतो. यावेळी पंढरीनाथ कांबळे जान्हवीकडे जातो आणि म्हणतो, “मला माहिती होतं की, तुला कधीतरी माझ्याशी या विषयावर बोलावंसं वाटेल.” हे ऐकल्यावर जान्हवी त्याला रडत-रडत सॉरी म्हणते. “माझं खरंच चुकलं” असं म्हणत अभिनेत्री हात जोडून माफी मागते. दरम्यान, आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख या सगळ्यावर जान्हवीला काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.