Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क सुरू आहे. या आठवड्यात संपूर्ण घरात जंगलराज ही थीम असणार आहे. त्यात गेल्या आठवड्यापासून घराला कॅप्टन नसल्याने अनेक नियमांचं वारंवार उल्लंघन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच निक्की ‘बिग बॉस’ला सगळ्या सदस्यांना शिक्षा द्या अशी विनंती करते. मात्र, हे घर सर्वांचं आहे त्यामुळे सर्वांनी याठिकाणी नियमाने वागलं पाहिजे असा निर्णय ‘बिग बॉस’कडून देण्यात येतो. यानंतर घरात सुरू होतं कॅप्टन्सी कार्य.

कॅप्टन्सी कार्यात दरवेळीप्रमाणे घरात दोन टीम्स पाडण्यात आल्या आहेत. ‘टीम ए’मध्ये निक्की, अरबाज, वर्षा, सूरज आणि धनंजय हे सदस्य आहेत. तर, ‘टीम बी’मध्ये जान्हवी, संग्राम, अंकिता, अभिजीत आणि पंढरीनाथ कांबळे हे सदस्य आहेत. हे सगळे सदस्य आता कॅप्टन्सीसाठी एकमेकांना भिडणार आहेत. पहिल्या फेरीत ‘ए टीम’कडून निक्की-अरबाज तर, ‘बी टीम’कडून जान्हवी-संग्राम खेळण्यासाठी जातात. मात्र, हा टास्क सुरू होण्यापूर्वी अरबाज संग्रामशी डील करतो.

हेही वाचा : “बिग बॉसच्या घरात निक्कीच्या बडबडीचा खूप त्रास होतो”, एलिमिनेट झालेल्या वैभव चव्हाणचं विधान, म्हणाला, “तिचा मूळ स्वभाव…”

पहिल्या फेरीत आम्ही तुला बाद करणार नाही तू आम्हाला करू नकोस अशी डील यांच्यात होते. अरबाज अगदी सहजपणे जान्हवी, संग्रामला अडवतो आणि यामुळे निक्की अंडी उचलून अंकिता आणि पंढरीनाथ यांच्या घरट्यात टाकते. यामुळे हे दोघंही कॅप्टन्सी कार्यातून बाद होतात. अंकिता ही गोष्ट पाहिल्यावर संग्रामच्या खेळाविषयी शंका उपस्थित करते. “दादा, तुम्ही पाहिलंत ना…त्याने कसं अडवलं तुम्ही तरी तसेच का उभे राहताय” असं ती विचारते. मात्र, आधीच डील झाल्यामुळे संग्राम उडवाउडवीची उत्तरं तिला देतो.

हेही वाचा : Bigg Boss Marathi- Video : ‘बिग बॉस’च्या घरात गॅस वापरावर निर्बंध, सगळ्यांचा उडणार गोंधळ! तर, ‘या’ गोष्टीमुळे वर्षा-निक्कीमध्ये होणार वाद

नेटकरी संग्रामचा हा खेळ पाहून चांगलेच संतापले आहेत. पंढरीनाथ कांबळेच्या इन्स्टाग्राम पेजवर बुधवारच्या टास्कचे अपडेट शेअर करण्यात आले होते. यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : नेटकऱ्यांनी संग्रामला केलं ट्रोल

नेटकऱ्यांनी संग्रामला केलं ट्रोल

“संग्राम तर महामंद आहे वाइल्ड कार्ड नाही हा चाइल्ड कार्ड एन्ट्री आहे…”, “संग्रामचा नेक्स्ट वैभव होतोय”, “भाऊ हा तर अरबाज ३ निघाला” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी संग्रामला ट्रोल केलं आहे. आपली टीम सोडून अरबाजशी हातमिळवणी केल्याप्रकरणी भाऊच्या धक्क्यावर ( Bigg Boss Marathi ) रितेश देशमुख त्याला काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.