Bigg Boss Marathi Nomination Task : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता ८ व्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. नुकताच भाऊच्या धक्क्यावर वैभवने घराचा निरोप घेतला. तर, आर्याला निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी निष्कासित करण्यात आलं. यामुळे गेल्या आठवड्यात २ जण बेघर होऊन आता घरातील उर्वरित १० सदस्यांमध्ये ‘बिग बॉस’चा पुढचा खेळ रंगणार आहे.

‘बिग बॉस’चा आठवा आठवडा सुरू झाल्याने आता या स्पर्धेची काठीण्य पातळी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आता या आठवड्यात प्रेक्षकांना ‘बिग बॉस’च्या घरावर ‘जंगलराज’ पाहायला मिळणार आहे. आठवड्याच्या थीमनुसार घरात पहिल्याच दिवशी ‘शिकाऱ्याची बंदूक’ हे नॉमिनेशन कार्य पार पडलं. घरात नॉमिनेशन टास्क सुरू होण्यापूर्वी घरातील सगळे सदस्य काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा करत होते. मात्र, ऐनवेळी ‘बिग बॉस’कडून या नॉमिनेशन कार्यात एक मोठा ट्विस्ट आणण्यात आला.

aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli And Arbaz Patel in Danger zone, janhvi, suraj varsha usgaonkar safe
Video: घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव ऐकताच निक्की तांबोळीचा फुटला टाहो, ‘हे’ सदस्य झाले सेफ, पाहा प्रोमो
Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”
big boss marathi these contestants nominated in this week
Bigg Boss Marathi : घरातील ६ सदस्य झाले नॉमिनेट! पण, नेटकऱ्यांकडून अंकिताचं कौतुक, काय आहे कारण?
Aarya Jadhao choose top 5 of Bigg Boss Marathi 5
तुझ्यासाठी Bigg Boss Marathi तील टॉप ५ सदस्य कोण? आर्या जाधवने घेतली फक्त ‘ही’ चार नावं, म्हणाली…
Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel got upset when Nikki and Abhijeet were announced as the popular couple
Video: ‘बिग बॉस’ची ‘ती’ घोषणा ऐकताच अरबाज पटेलचा पडला चेहरा, नेमकं काय घडलं?

हेही वाचा : Bigg Boss 18 : मराठी पाठोपाठ सुरू होणार हिंदी ‘बिग बॉस’! सलमान खानच्या आवाजातील पहिला टीझर प्रदर्शित, यंदा थीम असणार…

Bigg Boss Marathi : एकूण ५ सदस्य झाले नॉमिनेट

‘बिग बॉस’ने दोन गटांत घरातील सदस्यांची विभागणी केली. एका टीममध्ये निक्की, अरबाज, सूरज, वर्षा आणि जान्हवी हे पाच सदस्य होते. तर, दुसऱ्या टीममध्ये अभिजीत, अंकिता, धनंजय, पॅडी आणि संग्राम हे पाच जण होते. या सगळ्या सदस्यांना ‘बिग बॉस’ने आखून दिलेल्या पिवळ्या रेषेच्या मागे उभं राहायचं होतं. वाघाची दरकाळी होताच ‘बिग बॉस’ने निवड केलेल्या दोन सदस्यांना पळत जाऊन सर्वात आधी ‘शिकाऱ्याची बंदूक’ घेऊन पुन्हा आपल्या चौकोनात येऊन उभं राहायचं होतं. ज्या टीमचा सदस्य आधी चौकोनात पोहोचणार त्या टीमला पॉईंट्स मिळणार होते. तसेच या आठवड्यात हरणारी संपूर्ण टीम थेट नॉमिनेट होणार होती. त्यामुळे हा टास्क प्रत्येकाने जपून खेळणं आवश्यक होतं.

‘शिकाऱ्याची बंदूक’ या टास्कसाठी सर्वात आधी निक्की व अंकिताची जोडी पाठवण्यात आली. यामध्ये निक्कीने बाजी मारली. दुसऱ्या फेरीत वर्षा आणि धनंजय या सदस्यांमध्ये सामना रंगला… यावेळी मात्र डीपीने एकहाती विजय मिळवला. यानंतर अरबाज आणि पॅडीच्या तिसऱ्या फेरीत अरबाजने बाजी मारली. जान्हवी – अभिजीतमध्ये चौथ्या फेरीचा सामना अतितटीचा ठरला. या टास्कमध्ये अभिजीतने चपळता दाखवत लगेच बंदूक उचलली. तर, दुसरीकडे पळत येणाऱ्या जान्हवीचा पाय घसरल्याने तिच्या पायाला दुखापत झाली. दोन्ही टिमकडे २-२ गुण असल्यामुळे शेवटच्या फेरीत काय घडणार याकडे सगळेजण डोळे लावून बसले होते.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : नॉमिनेट झाल्यावर निक्कीने लावला डोक्याला हात

तिसऱ्या फेरीत सूरज विरुद्ध संग्राम असा सामना रंगला. मात्र, संग्रामच्या ताकदीपुढे सूरजचा निभाव लागला नाही. त्याने हा सामना जिंकत आपल्या टीमला इम्युनिटी मिळवून दिली आहे. तसेच शेवटच्या क्षणाला नॉमिनेशन पासून सुटका झाल्याने सध्या अभिजीतची ‘टीम बी’ आनंद व्यक्त करत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “साडी नेसणारी पोरगी पाहिजे”, ‘बिग बॉस’ने मैत्रिणीबद्दल विचारताच सूरज चव्हाण लाजला! अभिजीत म्हणाला, “अरे…”

एका टीममध्ये आनंदाचं वातावरण असताना, दुसरीकडे निक्कीच्या टीममध्ये नाराजी पसरली होती. जान्हवीला या टास्कमध्ये पायाला लागल्यामुळे दुखापत झाली. अशातच नॉमिनेट ( Bigg Boss Marathi ) झाल्यामुळे अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले होते. तर, निक्कीने नॉमिनेट झाल्याचं ऐकून डोक्याला हात लावला होता.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज असे पाच सदस्य नॉमिनट झाले आहेत. आता यांच्यापैकी कोण घरात राहणार कोण बाहेर जाणार हे आठवड्याच्या शेवटी भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होणार आहे.