Bigg Boss Marathi Rakhi Sawant : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच ‘फॅमिली वीक’ टास्क पार पडला. जवळपास २ महिन्यांनी घरात आलेल्या कुटुंबीयांची भेट घेतल्यावर सगळेच सदस्य भावुक झाले होते. कुटुंबीयांच्या भेटीचं हे गोड सरप्राइज मिळाल्यावर आता लवकरच ‘बिग बॉस’कडून सगळ्या सदस्यांना एक मोठा धक्का देण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या दोन व्यक्तींची ‘बिग बॉस’च्या घरात वाइल्ड एन्ट्री व्हावी अशी महाराष्ट्रभरात चर्चा होती. त्या दोन व्यक्ती अखेर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दाखल झाल्या आहेत.

प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी आणि ‘बिग बॉस’ हिंदीसह मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झालेली राखी सावंत आणि ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झालेले अभिजीत बिचुकले या दोघांनीही ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश घेतला आहे. या दोघांना घरात आलेलं पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. अभिजीत आणि राखी घरात आल्यावर कोणाकोणाची शाळा घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, राखीच्या एन्ट्रीने घरातील एका व्यक्तीला फारसा आनंद झालेला नाही आणि ती आहे निक्की. या दोघींमध्ये नेमकं काय कनेक्शन आहे जाणून घेऊयात…

हेही वाचा : Bigg Boss Marathi : २५ वर्षीय अरबाजला दारू-सिगारेटचं व्यसन आहे का? उत्तर देत म्हणाला, “मला फक्त एकच शौक…”

राखी सावंत आली Bigg Boss Marathi च्या घरात

निक्की तांबोळी आणि राखी सावंत या दोघीही ‘बिग बॉस’च्या हिंदी सीझनच्या १४ व्या पर्वात सहभागी झाल्या होत्या. दोघीही घरात राहून प्रचंड भांडणं करायच्या. राखी अन् निक्कीची भांडणं संपूर्ण सीझनमध्ये गाजली होती. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड म्हणून राखीला आणा कारण, निक्कीसाठी राखीच बरोबर आहे अशी मागणी ‘बिग बॉस मराठी’चे चाहते आणि काही कलाकारांकडून वारंवार करण्यात येत होती. अखेर प्रेक्षकांची इच्छा आता पूर्ण झालेली आहे. फक्त राखी स्पर्धक म्हणून नव्हे तर पाहुणी म्हणून ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री करणार आहे.

हेही वाचा : Video : “तुझ्यामुळे आज आम्ही…”, घरात आल्या सूरज चव्हाणच्या बहिणी व आत्या; ‘ते’ शब्द ऐकताच सर्वांचेच डोळे पाणावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Bigg Boss Marathi Rakhi Sawant
Bigg Boss Marathi Rakhi Sawant : राखी सावंत आली ‘बिग बॉस’च्या घरात ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

मुख्य प्रवेशद्वारातून राखी सावंत येत असल्याचं पाहताच एकीकडे निक्कीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो…तिचा चेहरा पडतो आणि दुसरीकडे “बाईSSS…” हा निक्कीचा डायलॉग म्हणत ‘बिग बॉस’च्या घरात राखीची एन्ट्री होते. २०२० नंतर या दोघी आता ४ वर्षांनी पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात आमनेसामने आल्या आहेत. त्यामुळे हा भाग पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.