बिग बॉसमध्ये वाद, रुसवे-फुगवे, प्रेमप्रकरण अशा गोष्टी सहज पाहायला मिळतात. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची चर्चा आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या स्पर्धेत टॉपमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून अभिनेत्री रुचिरा जाधव बाहेर पडली. या पर्वामध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे हे रिअल लाईफ कपल सहभागी झाले होते. मात्र बिग बॉस मराठीच्या घरात रोहित आणि रुचिराचे मतभेद झाले. यानंतर तिने त्याला अनफॉलो केले होते. आता तिने रोहितला अनफॉलो करण्याबद्दलचे कारण सांगितले आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीला गोडीगुलाबीने वावरणाऱ्या रोहित-रुचिरा या जोडीमध्ये हळूहळू मतभेद व्हायला लागला. गेल्या आठवड्यात त्यांच्यात वाद देखील झाला. अशातच रुचिरा नॉमिनेट झाल्याने त्यांच्यामधला वाद आणखी चिघळला. कार्यक्रमामधून बाहेर पडल्यानंतर तिने रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले. यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. अखेर रुचिरा जाधवने केलेल्या इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान या प्रश्नाला उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : फोटोशूटमुळे झालेली ओळख ते ‘बिग बॉस’ मराठीतील बोल्ड जोडी, अशी आहे रुचिरा आणि रोहितची लव्हस्टोरी

Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
Secret History of the First Microprocessor
चिप-चरित्र : पहिली ‘बहुउद्देशीय’ चिप!

रुचिरा जाधव काय म्हणाली?

“मी रोहितला अनफॉलो का केलं हे तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य नाही तर परमकर्तव्य आहे. मला जे खूप सुरुवातीपासून फॉलो करतात त्यांना माझ्याबद्दल फार चांगलं माहिती आहे. मी फार व्यक्तींना कधीही फॉलो केलेलं नाही. १०, २० फार फार तर २५ इतकेच लोक होते. आता टीम हँडल करत होती त्यामुळे ते कदाचित ३५ ते ४० पर्यंत गेले असावं. मी फक्त माझ्या प्रेरणादायी व्यक्तींना फॉलो करते, दुसरं मी माझ्या कुटुंबाला फॉलो करते. रोहित हा माझ्या कुटुंबातील व्यक्तींपैकी एक आहे. त्यामुळे मी त्याला, ऋतुजा माझ्या बहिणी आहेत यांना फॉलो करायचे. त्याबरोबरच माझे इतर काही मित्र मैत्रिणी आहेत ते मला फॉलो करायचे आणि मी त्यांना फॉलो बॅक करायचे.

त्यावेळी ते मनापासून केलेले फॉलोईंग होतं. पण मला सकाळी सकाळी इन्स्टाग्राम बघायची सवय आहे. मी फेसबुक फार कमी वापरते. सकाळी उठल्यानंतर मला काय बघायला आवडेल, मी तितक्याच लोकाना फॉलो करते. इतका माझा फंडा क्लिअर आहे. कारण कोणाच्या आयुष्यात काय सुरु आहे, हे मला फार जाणून घ्यायची सवय नाही. त्यामुळे मी तितक्याच लोकांना फॉलो करते, असे तिने सांगितले.

मी त्याला ब्लॉक केलेले नाही”

“आता रोहितला अनफॉलो करण्यामागंच कारण म्हणजे मी त्याला फक्त इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले आहे. मी त्याला ब्लॉक केलेले नाही किंवा फेसबुकवरुन अनफॉलो केलेले नाही. फक्त इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे, कारण तो अजूनही बिग बॉसमध्ये आहे. त्याच्या त्या गोष्टी सतत त्याच्या अकाऊंटवर येत जातात. मी जेव्हा त्या बघेन तेव्हा मला त्रास होईल. त्यामुळे माझा जरा विचार थोडा तरी करा. प्रश्न विचारुन मला त्रास देऊ नका. हेच त्यामागचे कारण आहे.

आणखी वाचा : “आठ वर्षांचं प्रेम आहे माझं पण…” गर्लफ्रेंडचे पत्र वाचताच अक्षय केळकर ढसाढसा रडला

जेव्हा त्या गोष्टी शॉर्ट होतील तेव्हा मी त्याला मनापासून फॉलो करेन. फॉलो आणि अनफॉलो हे मी सतत करणार नाही. मला लाखो रुपये दिले तरी मी त्याला फॉलो करणार नाही. अनफॉलो केल्यामुळे लगेचच तर्क-वितर्क लावू नका. एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचू नका”, असेही रुचिरा यावेळी म्हणाली.