छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व होऊन महिना उलटला आहे. मात्र पहिल्या दिवसापासूनच या कार्यक्रमात गॉसिप, भांडण आणि राडे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवसांपासून या शो ची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. पण यंदा बिग बॉसचे पर्व चर्चेत असण्याचे कारण म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर.

अपूर्वा नेमळेकरने या घरात एंट्री केल्यापासूनच टीममध्ये काम करणे, आरडाओरड करणे या गोष्टींना सुरुवात केली आहे. तसेच ती कायमच लीडरशीपच्या भूमिकेत पाहायला मिळते. अनेकदा तिचे सदस्यांबरोबर खटके उडवताना दिसत आहेत. तिच्या या गेममुळे अनेकजण तिचे कौतुक करताना दिसत आहेत. तर काहींनी तिच्यावर टीकाही केली आहे.
आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…

नुकतंच अपूर्वा नेमळेकरच्या बिग बॉसमधील खेळाबद्दल ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील अण्णा नाईक यांची पत्नी इंदूमती नाईक हिने प्रतिक्रिया दिली. या मालिकेत इंदूमती नाईक हे पात्र अभिनेत्री शकुंतला नारे यांनी साकारले होते. एका मुलाखतीत त्यांना अपूर्वा नेमळेकरच्या खेळाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ‘मी त्यावर बोलू शकत नाही’, असे सांगितले.

“मला माझ्या व्यस्त कामातून काय सुरु आहे हे बघायला अजिबात वेळ मिळत नाही. दोन-तीन दिवस कधी तरी माझं शूट नसतं, पण खरंच मला सतत बिग बॉस बघायला तर अजिबात वेळ मिळत नाही. मी ते सतत बघितलं तर मी त्यावर बोलू शकते. नाहीतर उगाच मी काहीतरी पाहिलं आणि बोलली तर ते चुकीचं ठरेल. त्यामुळे मी त्यावर काहीही बोलू शकत नाही”, असेही शकुंतला नारे यांनी सांगितले.

आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने शेवंता हे पात्र साकारले होते. तिच्या या पात्रामुळे अल्पावधीतच ती प्रसिद्ध झाली. या मालिकेत अभिनेत्री शकुंतला नारे यांनी इंदूमती नाईक ही भूमिका साकारली होती. त्यांचे हे पात्र आजही चर्चेत असते. या मालिकेमुळे ते दोघेही आजही प्रसिद्धीझोतात असल्याचे पाहायला मिळते.