Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सध्या गणपती स्पेशल ‘भाऊचा धक्का’ सुरू आहे. शनिवारी (७ सप्टेंबर) झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि चुकीच वागणाऱ्या स्पर्धकांना चांगलंच सुनावलं. यामध्ये निक्की तांबोळी हिचा पहिला नंबर होता. रितेशने निक्कीची चांगलीच शाळा घेतली आणि सोबतचं तिला दोन मोठ्या शिक्षा देखील दिल्या. त्यानंतर रितेशने अरबाज पटेलला चांगलंच धारेवर धरलं. “स्ट्राँग प्लेयर ही जी इमेज तुम्ही तयार केली होती ना, ती मातीत मिळवली”, अशा शब्दात रितेशने अरबाजला सुनावलं. त्यानंतर घनःश्याम दरवडे ‘बिग बॉस मराठी’तून बाहेर झाला.

या आठवड्यासाठी एकूण सात स्पर्धक नॉमिनेट झाले होते. अरबाज पटेल, आर्या जाधव, निक्की तांबोळी, धनंजय पवार, अभिजीत सावंत, छोटा पुढारी घन:श्याम आणि सूरज चव्हाण या सात जणांना इतर सगळ्या स्पर्धकांनी नॉमिनेट केलं होतं. त्यामुळे सात जणांपैकी घनःश्याम दरवडे घराबाहेर झाला. आज ‘भाऊच्या धक्क्या’वर गणेशोत्सवानिमित्ताने दमदार मनोरंजन होणार आहे. तसंच काही टास्क देखील खेळले जाणार आहेत. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – Video: रश्मी ठाकरेंनी अँटिलियाच्या राजाचं घेतलं दर्शन, सिल्कच्या साडीतील लूकने सर्वांचं वेधलं लक्ष

पंढरीनाथ कांबळे निक्कीबद्दल नेमकं काय म्हणाला?

नुकताच ‘टीआरपी मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर पंढरीनाथ कांबळेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत पंढरीनाथ कांबळे निक्कीला कडू लाडू भरवताना दिसत आहे. हा कडू लाडू भरवण्यामागचं कारण देत पंढरीनाथ म्हणतो की, भाऊ, हा लाडू मला निक्कीला भरवायची इच्छा आहे. कारण सुरुवातीला जे काही पहिल्या आठवड्यात झालं होतं. ते मधेमधे तिच्या तोंडून पोक होतं असतं. खरंतर ओके आहे. मला त्याबद्दल तशी फार काही तक्रार नाही. पण तिच्या सोयीने जेव्हा ती रागवलेली असते किंवा तिला हार्श शब्दात काहीतरी सांगायचं असतं. तेव्हा पंढरीसर तुम्ही एक काम करा, तुम्ही असं करा आणि तसं करा. आणि जेव्हा नॉर्मल असते तेव्हा पॅडी दादा, पॅडी दादा करत असते. तर मला तिने खरंतर सरसकट नुसतं पॅडी म्हटलं किंवा नुसतं पॅडी दादा म्हटलं किंवा नुसतं पंढरी सर म्हटलं तरी चालणार आहे. आता फक्त हा जो कडू लाडू आहे तो मी निक्कीला भरवतोय. तो तिने गोड मानून घ्यावा.

हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी’मध्ये होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री, जबरदस्त राडा घालायला येतोय रांगडा गडी, नेटकरी म्हणाले, “कोल्हापुरचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर पंढरीनाथ कांबळे निक्कीला लाडू भरवत म्हणतो, “थँक्यू वेरी मच. तुझ्याकडे लाडू ठेव.” तेव्हा रितेश देशमुख विचारतो, “नीट घास घेतलाय का?” पंढरीनाथ म्हणतो, “घेतला.” यावेळी निक्की म्हणते, “सर, भरभरून मिळतील म्हणून हळूहळू खातेय.”