Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व दणक्यात सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला काहीना काहीतरी घडताना दिसत आहे. सातव्या आठवड्यात बऱ्याच गोष्टी घडल्या. पण या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एक निंदनीय घटना घडली. कॅप्टन्सी टास्कदरम्यान आर्याने निक्कीला कानशिलात लगावली. यामुळे सध्या घरातील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर आर्याला तात्पुर्ती जेलमध्ये जाण्याची शिक्षा दिल्यानंतर आता ‘भाऊच्या धक्क्या’वर कठोर शिक्षा सुनावली जाणार आहे. आर्याला आता कोणती शिक्षा दिली जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ‘भाऊच्या धक्क्या’वर आर्या व्यतिरिक्त घरातील सर्व सदस्यांना रितेश देशमुख जागं करताना पाहायला मिळाला.

नुकताच ‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर ‘भाऊच्या धक्क्या’चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुखने सर्व सदस्यांना एका गाण्याद्वारे जागं आणताना दिसत आहे. यावेळी सर्व सदस्यांना देखील आश्चर्याचा धक्काच बसला. नेमकं काय घडणार? असा प्रश्न सगळ्यांना पडला.

ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर कबुली दिल्यावर अंकिताने सांगितला किस्सा, म्हणाली…
Hina Khan
केमोथेरपीचे परिणाम, कॅन्सरग्रस्त हिना खानने शेअर केला डोळ्याचा…
suraj chavan meets ajit pawar after he won bigg boss marathi
“झापुक झुपूक बच्चा…”, Bigg Boss विजेत्या सूरजची डायलॉगबाजी ऐकून अजित पवारांना हसू अनावर; व्हिडीओ व्हायरल
Bigg Boss 18 First Elimination
Bigg Boss 18: बिग बॉसला पहिल्याच आठवड्यात अडचणीत आणणारा सदस्य घराबाहेर, कोण आहे तो? जाणून घ्या
aishwarya and avinash narkar dances on jogwa movie lallati bhandar song
“लल्लाटी भंडार…”, गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स! दोघांच्या एनर्जीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक, पाहा व्हिडीओ
premachi goshta fame actress komal balaji aka swati bought new home
‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीने खरेदी केलं नवीन घर! शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो, होतोय कौतुकाचा वर्षाव
ankita walawalkar aka kokan hearted girl shares emotional post for father
“बाबा पहिल्यांदा मुंबईत आले तो क्षण…”, अंकिताची वडिलांसाठी भावुक पोस्ट; म्हणाली, “Bigg Boss मध्ये मला…”
divya khosla kumar accuses alia bhatt
थिएटर रिकामी, ‘जिगरा’चं Fake कलेक्शन अन्…; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आलिया भट्टवर मोठा आरोप! थेट फोटो शेअर करत म्हणाली…
apurva nemlekar talks about divorce at 26 father and brother died
“ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं…”, अपूर्वा नेमळेकरचं घटस्फोटाबद्दल वक्तव्य; बाबांची माफी मागत म्हणाली, “मी चुकले…”

हेही वाचा – “आपला पॅडी का रडला?” याचं उत्तर देत विशाखा सुभेदारने सांगितला पंढरीनाथ कांबळेचा किस्सा, म्हणाली, “हा माणूस…”

Bigg Boss Marathi Season 5 (Photo Credit – Colors Marathi)

या प्रोमोमध्ये, रितेश देशमुख सर्व सदस्यांना म्हणतो की, या घरात रोज एक वेकअप साँग वाजतं. मी रोज टीव्हीवर पाहतो. पण आज मला हे लाइव्ह पाहायचं आहे. मी आता एक गाणं वाजवणार आहे आणि सगळ्यांनी तो वेकअप डान्स करायचा आहे…चला सगळे उठा…काय सूरज तयार एकदम. चला लावा गाणं. त्यानंतर ‘हीच आमची प्रार्थना’ हे गाणं लावलं जातं.

हे गाणं ऐकून सर्व सदस्य चकीत होतात. यावेळी सूरज हात जोडताना दिसत आहे. तर काही सदस्य मान खाली करून उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत. गाणं झाल्यावर रितेश देशमुख विचारतो, “काय? एनर्जी नाही? डान्स नाही? हे वेकअप साँग नव्हतं. हा वेकअप कॉल होता.”

हेही वाचा – Video: “मिस्टर इंडिया”, म्हणत रितेश देशमुखने संग्राम चौगुलेची केली कानउघडणी, म्हणाला, “या घरात तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून आला नाहीत तर…”

दरम्यान, ‘भाऊच्या धक्क्या’च्या या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “माणुसकी फक्त सूरज आणि अंकिताने दाखवली, असं कोणाला वाटतं?” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, जबरदस्त. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “माणुसकी फक्त सूरजकडे.”