Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता होती. अखेर ‘कलर्स मराठी’ वाहिनीकडून याची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. यंदा ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व २८ जुलैपासून सुरू होणार आहे. या शोमध्ये यावर्षी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यातला सर्वात मोठा बदल म्हणजे या पाचव्या सीझनचं होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. यापूर्वीच्या सीझनची धुरा ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी सांभाळली होती. आता रितेश पहिल्यांदाच ही जबाबदारी निभावणार आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत संवाद साधताना रितेशने बऱ्याच गोष्टींबाबत खुलासा केला आहे.

रितेश म्हणाला, “‘बिग बॉस मराठी’ ( Bigg Boss ) या शोचा मी प्रचंड मोठा फॅन आहे. त्यामुळे मला ही संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी कलर्स मराठी वाहिनीचे आभार मानतो. मला शोबद्दल विचारल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया होती की, ‘केव्हा लाँच होईल हा शो?’ कारण, बिग बॉस होस्ट करायची माझी मनापासून इच्छा होती. मी या शोचा फॅन होतो, त्यामुळे संधी मिळाली तसा लगेच मी होकार कळवला. माझ्या दोन-तीन शूटच्या तारखा देखील मी बदलल्या होत्या. हा शो यंदा होस्ट करण्याची संधी मिळाली यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे.”

हेही वाचा : Video : ‘सूसेकी’ गाण्यावर माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा! मराठी ठसका दाखवत जबरदस्त डान्स

Bigg Boss होस्ट करणं ही सर्वात मोठी गोष्ट – रितेश देशमुख

“शोमध्ये यावर्षी कोणते स्पर्धक येणार आहेत हे मला सुद्धा माहिती नाही. मी फक्त सध्या टीमबरोबर होस्टिंगची तयारी करतोय. मला नेहमीच नवनवीन गोष्टी करायला आवडतात. आयुष्यात मला बऱ्याच संधी मिळाल्या आणि मी प्रत्येक ठिकाणी माझे शंभर टक्के दिले आहेत. सध्या माझ्या आयुष्यात ‘बिग बॉस’ होस्ट करतोय ही सर्वात मोठी गोष्ट आहे” असं रितेशने सांगितलं.

हेही वाचा : ‘धर्मवीर २’मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणा श्रीकांत शिंदेंची भूमिका, पहिल्याच चित्रपटामुळे रातोरात झालेला स्टार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
riteish deshmukh
( Bigg Boss ) रितेश देशमुख

तुमच्या घरातील बिग बॉस कोण?

“तुमच्या घरातील बिग बॉस कोण?” असा प्रश्न विचारताच रितेश म्हणाला, “माझ्याच नव्हे तर प्रत्येकाच्या घरात एकच बिग बॉस असतो…तो बॉस म्हणजे त्याची बायको. माझी मुलं बिग बॉस बघत नाहीत कारण, त्यांच्यासाठी घरात घडतं तेच बिग बॉस आहे आणि जिनिलीया बद्दल सांगायचं झालं तर, माझ्या आयुष्यात कोणतीही गोष्ट घडली तर मी सर्वात आधी तिलाच सांगतो. तिचं मत हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मी बिग बॉस करावं ही तिची मनापासून इच्छा होती कारण, आम्ही दोघंही बिग बॉस शोचे खूप मोठे फॅन आहोत.”