Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. यंदा या शोमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण आणि निखिल दामले या सदस्यांनी घराचा निरोप घेतला. सध्या उर्वरित १३ स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून दोन गट पडले आहेत. एक गट निक्की, अरबाज, वैभव, जान्हवी यांचा आहे. तर, दुसऱ्या गटात अभिजीत, अंकिता, डीपी, पॅडी, आर्या, सूरज हे सदस्य आहेत. दरवेळी निक्कीची टीम एकत्र येऊन डावपेच करत ‘बी’ टीम विरुद्ध कुरघोड्या करत असते. याशिवाय जान्हवी आणि निक्कीने अनेकदा घरातील अन्य सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील भाष्य केलेलं आहे. त्यामुळे एकंदर या टीमचं इथून पुढे सहन करायचं नाही असा निर्धार सूरज चव्हाणने केला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Glycerine राहिलं, बाहेर आल्यावर पुरस्कार अन्…; जान्हवीने माफी मागितल्यावर मराठी कलाकारांनी उडवली खिल्ली; म्हणाले…

सूरज गार्डन परिसरात अभिजीत आणि आर्या यांच्याशी बोलत होता. यावेळी त्याने निक्की अन् तिच्या टीम विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. सूरज निक्कीबद्दल नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात…

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

सूरजने निक्कीशी भिडण्याचा केला निर्धार

“जिथे अत्याचार होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार…बोलत नाही ना म्हणून गरीबांचा असा फायदा घेतात. निक्कीने केलं की आपण सहन करून घ्यायचं आणि आर्याने केलं तर…? आपल्या ग्रुपमधलं कोणीही असू दे…त्याच्या सपोर्टला जायचं म्हणजे जायचं! तू नड…” असं सूरज अभिजीत व आर्याला म्हणाला.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “तुझ्या खोट्या अश्रूंना तो Its Ok…”, जान्हवीने रडून माफी मागितल्यावर विशाखा सुभेदारने सुनावलं! म्हणाली, “पंढरीनाथ…”

हेही वाचा : Video : जान्हवीने ढसाढसा रडत मागितली माफी! पंढरीनाथ कांबळेसमोर हात जोडून म्हणाली, “मी गेम खेळताना अती…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
bigg boss marathi

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. घरात ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कमध्ये बीबी करन्सी जिंकता न आल्याने अरबाजला आपल्या कॅप्टन्सीवर पाणी सोडावं लागलं आहे. अरबाजने स्वत: कॅप्टन्सी सोडून त्याच्याऐवजी निक्कीला घराचं कॅप्टन केलं आहे. त्यामुळे आता निक्की घराचा कार्यभार कसा सांभाळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.