छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ मराठीला ओळखले जाते. बिग बॉसची मराठीची तिन्ही पर्व हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. यंदाचे पर्व हे पहिल्या दिवसांपासूनच चर्चेत आहेत. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाबद्दल अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकांनी तर बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनवरुन ट्रोलिंग सुरु केले आहे. नुकतंच बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेने या पर्वावर टीका केली आहे.

‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून मेघा धाडेला ओळखले जाते. बिग बॉसमुळे ती घराघरात पोहोचली. मेघा घाडगे ही मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनेकदा ती विविध गोष्टींवर प्रतिक्रिया देताना दिसते. नुकतंच पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख ही बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने चाहत्यांचे आभार मानले होते. त्यावर कमेंट करत मेघा धाडेने संताप व्यक्त केला आहे. या पर्वाचं सगळंच गंडलंय, असे तिने म्हटले आहे.  
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : ‘शेवंता’, किरण माने अन् ‘मिसेस मुख्यमंत्री’…, ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी होणाऱ्या कलाकारांची संपूर्ण यादी

“बिग बॉस मराठीच्या या टप्प्यावर बाहेर पडलेय या दु:खातून मी अजून बाहेर पडले नाहीये…थोडक्यात ऑल इज नॉट वेल… काय चूक, काय बरोबर, काय फेअर, काय अनफेअर…याचं विश्लेषण तेव्हाही सुरु होतं आणि आत्ताही सुरु आहे. पण तुमच्या प्रेमामुळे आतमध्ये असताना मला ऊर्जा मिळत होती आणि त्याच गोष्टीमुळे आतासुद्धा मिळतेय… तेव्हा तुम्ही तुमच्यातील सकारात्मक उर्जा ही कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा म्हणजे सगळं वाटेल.. All Is Well! धन्यवाद”, असे अमृता देशमुखने म्हटले होते.

आणखी वाचा : “काय फेअर, काय अनफेअर…” ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या अमृता देशमुखची पहिली पोस्ट

त्याखाली मेघा धाडेने कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. ‘या पर्वाचं सगळंच गंडलंय. आणखी एक अनफेअर इविक्शन. पण तू निराश होऊ नकोस. तू खूप छान खेळलीस. बिग बॉसच्या घराबाहेर एक मोठा चाहता वर्ग आहे जो तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्या प्रामाणिकपणाची आणि प्रयत्नांची कदर करतो. तू चांगल्या मनानं काम करत राहा. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम, असे मेघा धाडे म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अमृता देशमुखचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला. या खेळातून तिला बाहेर पडावे लागेल. सुरुवातीच्या दिवसांत अमृताचा घरातील वावर फार कमी होता. पण नंतर तिने स्वत:ला सिद्ध करत खेळ खेळायला सुरुवात केली होती. टास्कदरम्यानही तिची आक्रमकता दिसून आली होती. पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक नॉमिनेशन टास्कमध्ये अमृताला घरातील सदस्यांनी नॉमिनेट केलेलं पाहायला मिळालं. आता विकास व अमृता घरातून बाहेर पडल्यानंतर खेळात टिकून राहण्यासाठी स्पर्धकांना नवे डावपेच व आणखी तल्लख बुद्धीने खेळ खेळावा लागणार आहे.