आपल्या अतरंगी फॅशन आणि सडेतोड स्वभावामुळे उर्फी जावेद कायम प्रसिद्धीच्या झोतात येत असते. उर्फी जावेद तिच्या मनातलं बोलण्यापासून कधीच मागे हटत नाही. यावेळी फॅशनसाठी नव्हे तर आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. साजिदला सेलिब्रिटी रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होऊ दिल्याबद्दल तिने यापूर्वी बिग बॉस १६ निर्मात्यांवर टीका केली होती. उर्फीने पुन्हा एकदा साजिद खानवर निशाणा साधला आहे.

उर्फीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर साजिदच्या कृतीबद्दल बोलण्यासाठी एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला ज्यात ती म्हणाली ‘आता माझ्या सेल्फींवर तुमचे लक्ष लागले आहे, मी तुम्हा सर्वांना आठवण करून देऊ इच्छिते की साजिद खानने ज्या मुलींचा विनयभंग केला आहे किंवा ज्यांची त्याने शिकार केली आहे किंवा जे काही केले आहे त्याबद्दल त्याने कधीही माफी मागितलेली नाही. त्याने देशाची माफीही मागितलेली नाही पण स्वतःचा बचाव करण्यापेक्षा निदान ही गोष्ट तरी चांगली आहे’, असं उर्फीने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

व्हीएफएक्स कंपनीचे नाव रेड चिलीज का ठेवलं? शाहरुख खानने उघड केलं गुपित

उर्फीने पुढे लिहले आहे की ‘त्याने कधीही माफी मागितली नाही पण त्याच्या त्याने कृतीचा बचाव केला आहे. एका साध्या सॉरीने त्याने जे केले ते पूर्ववत होणार नाही, परंतु आपण जे केले त्याचा बचाव करण्यापेक्षा हे चांगले आहे’. उर्फीपूर्वी गायिका सोना मोहपात्रा हिने साजिदच्या शोमध्ये सहभागी झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
urfi javed

एकीकडे साजिद खानवर टीका होताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे बिग बॉसच्या माजी स्पर्धक पायल रोहतगी आणि कश्मिरा शाह यांनी साजिद खानला आपला पाठिंबा दर्शवला आहे. दिग्दर्शक साजिद खान गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. ‘हाऊसफुल्ल’,’ हे बेबी’, ‘हिम्मतवाला ‘यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.