९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री काजोलनं आपल्या जबरदस्त अभिनयातून ओटीटीवर एक वेगळीच छाप पाडली आहे. ‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटानंतर काजोलची नुकतीच ‘द ट्रायल’ वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्रीनं पहिल्यांदाच वकिलाची भूमिका साकारली आहे. ओटीटीनंतर आता काजोलची छोट्या पडद्यावर एंट्री होणार आहे. लोकप्रिय हिंदी मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधून काजोल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून राजन शाही यांची ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेची लोकप्रियता पाहून काजोलनं हा मोठा निर्णय घेतला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमध्ये ‘द ट्रायल’ वेब सीरिजचे प्रमोशन करण्यासाठी काजोल एंट्री करणार आहे. याचा व्हिडीओ स्टार प्लसच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे आता काजोलला मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा – ‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम अभिनेत्री कास्टिंग काऊचची झाली होती शिकार; खुलासा करत म्हणाली, “मला…”

हेही वाचा – मुलाचं नाव मुस्लिम ठेवलं अन्…; अभिनेत्रीला डिलीट करावा लागला ‘तो’ व्लॉग, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अभिनेता हर्षद चोप्रानं अभिमन्यू, तर अभिनेत्री प्रणाली राठोडनं अक्षरा ही प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘अभिरा’ असं या जोडीचं नाव आहे.

हेही वाचा – Bigg Boss OTT 2: “नरकातून बाहेर आलो”, ‘या’ सदस्यानं बिग ओटीटीच्या घरातला सांगितला भयानक अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर काजोलची ‘द ट्रायल’ ही वेब सीरिज ‘द गुड वाइफ’ या अमेरिकन सीरिजचं हिंदी रूपांतर आहे. अजय देवगण, दीपक धर, मृणालिनी जैन व राजेश चड्ढा यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. १४ जुलैला ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’वर ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. नायोनिका सेनगुप्ता हिच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कहाणी असून नायोनिकेच्या भूमिकेत काजोलला पाहता येणार आहे.