scorecardresearch

Video : “मला तुझी आठवण येतेय…” रणवीर सिंगने दिल्या बिग बॉस मराठीच्या ‘या’ सदस्याला शुभेच्छा

आता चक्क बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने तिचे कौतुक केले आहे.

Video : “मला तुझी आठवण येतेय…” रणवीर सिंगने दिल्या बिग बॉस मराठीच्या ‘या’ सदस्याला शुभेच्छा

यंदा बिग बॉस मराठीचे चौथे पर्व फार चर्चेत आहे. मग ते टास्क असो त्यातील सदस्यांचे नाते असो किंवा मग सदस्यांमध्ये असलेले वाद विवाद असो… घरातील प्रत्येक सदस्य स्वत: ला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. अनेक सदस्यांना टास्कपेक्षा नॉमिनेशनमध्ये येण्याची भीती असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक सदस्य नॉमिनेशनपासून दूर कसे रहाता येईल याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहेत. यंदा बिग बॉसच्या घरात अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सहभागी झाली आहे. त्या खेळामुळे अनेक प्रेक्षक तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे. आता चक्क बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने तिचे कौतुक केले आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने तेजस्विनी लोणारीसाठी खास शुभेच्छा देणारा व्हिडीओ तयार केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तेजस्विनीने स्वत:च्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ रणवीर म्हणाला, “तेजू तू ५० दिवस पूर्ण केले आहेत. तुला खूप खूप शुभेच्छा. महेश सरांनाही माझा नमस्कार. मला तुझी आठवण येते. तू जिंकून ये आपण जंगी सेलिब्रेशन करुया. त्याला तिने हटके कॅप्शन दिले आहे.”
आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…

“एका उत्साही व्यक्तीकडून दुसऱ्याला शुभेच्छा. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून चित्रविचित्र फॅशन, अभिनय आणि इतर सर्व गोष्टींमुळे चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंग. खूप खूप धन्यवाद. आमच्या #TerrificTejaswini ने बिग बॉस मराठीच्या घरात ५० दिवस यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल तिचे अभिनंदन. तसेच तिच्या उर्वरित प्रवासासाठी तिला खूप प्रेम. तसेच ती यशस्वी व्हावी यासाठी धन्यवाद”, असेही या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : फोटोशूटमुळे झालेली ओळख ते ‘बिग बॉस’ मराठीतील बोल्ड जोडी, अशी आहे रुचिरा आणि रोहितची लव्हस्टोरी

दरम्यान यंदा बिग बॉसचे चौथे पर्व विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून त्यात दिवसेंदिवस येणारे ट्विस्ट, स्पर्धकांचे मतभेद, कामांवरुन होणारे वाद आणि त्यांचा खेळ यावरुन बिग बॉसचे चौथे पर्व गाजताना दिसत आहे. यंदा बिग बॉसचे पर्व ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या