बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत बॉयफ्रेंड आदिल खानबरोबरच्या लग्नामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. राखी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. टॉप ५ फायनलिस्टपैकी राखी एक होती. नऊ लाखांची रोख रक्कम घेऊन राखीने पाचव्या स्थानावर समाधान मानलं. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच राखीने तिच्या आईच्या आजाराबाबत माहिती दिली होती.

राखीची आई सध्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, आईच्या उपचाराचा खर्च फार जास्त असल्याचं म्हणत राखीने मदतीसाठी आवाहन केलं होतं. त्यानंतर आता उद्योगपती मुकेश अंबानी राखीच्या मदतीला धावून आले आहेत. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजने राखीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा>>मुंबईतील रस्ते व मेट्रोबाबत अमृता फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाल्या “आमच्या नागपूरसारखे…”

राखीने विरल भय्यानीशी बोलताना मुकेश अंबानी यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, “माझी आई आजारपणामुळे कोणाला ओळखतही नाही आहे. तिला आम्ही दोन महिन्यांसाठी क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करत आहोत. या रुग्णालयाची फी अंबानींमुळे थोडी कमी करण्यात आली आहे. मला मदत केली त्याबाबत मी अंबानींचे आभार मानते”.

हेही वाचा>> महाराष्ट्राला ‘वेड’ लावल्यानंतर जिनिलीया देशमुख नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला; सिंगल मदरची भूमिका साकारणार

हेही वाचा>> कुणी नस कापली तर कुणी विषप्राशन केलं; प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या निधनानंतर चाहत्यांनी आत्महत्या का केल्या होत्या?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राखी व आदिलने सात महिन्यांपूर्वीच लग्न केल्याचं समोर आलं आहे. मे महिन्यात कोर्ट मॅरेज करत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. परंतु, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर राखीने याचा खुलासा केला.