मराठी कलाविश्वातील अनेक नावाजलेल्या विनोदवीरांपैकी एक विनोदवीर म्हणजे भाऊ कदम. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे ते महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. भाऊने आजवर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. भाऊ कदमने नुकतंच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी भाऊ कदम यांनी पत्नी ममता कदम एक खास गिफ्ट दिलं आहे.
भाऊ कदम यांची लेक मृण्यमी कदमने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत भाऊ कदम यांच्या तीन मुली आणि एक मुलगा त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन करताना दिसत आहे. यावेळी त्यांनी केक कापत घरच्या घरी वाढदिवस साजरा केला.
आणखी वाचा : “डोळ्यात लेन्स, लांबलचक दाढी अन्…” ऋषी सक्सेनाने ‘असं’ साकारलं ‘सुभेदार’मधील नकारात्मक पात्र, पाहा व्हिडीओ
यानंतर भाऊ कदम हे पत्नी ममताला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक भेटवस्तू देताना दिसत आहे. भाऊ कदम यांनी पत्नीला सुंदर झुमके भेट म्हणून दिले आहेत. या झुमक्याची डिझाईन अत्यंत नाजूक असून त्यावर डायमंड पाहायला मिळत आहे.
तर भाऊ कदम यांच्या पत्नीनेही त्यांना सोन्याचे ब्रेसलेट भेट म्हणून दिलं आहे. त्याचीही झलक तिने या व्हिडीओत दाखवली आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
दरम्यान भाऊ कदम यांच्या लेकीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. भाऊ कदमने विनोदाचं अचूक टायमिंग साधत अनेकांची मनं जिंकली. उत्तम अभिनय शैलीद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता म्हणून तिला ओळखते जाते.