scorecardresearch

“तुम्ही सल्ला द्या असं म्हणणार नाही…”, श्रेया बुगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

श्रेया बुगडेने शेअर केलेल्या फोटोंचं कॅप्शन चर्चेत

shreya bugde, shreay bugde instagram, shreaya bugde post, shreya bugde uttarakhand trip, श्रेया बुगडे, श्रेया बुगडे इन्स्टाग्राम
(फोटो सौजन्य- श्रेया बुगडे इन्स्टाग्राम)

झी मराठीवरील ‘चल हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमातील कलाकारांनाही प्रसिद्धी मिळाली आहे. अभिनेत्री श्रेया बुगडेही या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे आणि सोशल मीडियावरही तिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा श्रेया तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आपल्या कामाचे अपडेट देत असते. आता तिने शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रेया बुगडे सध्या उत्तराखंडच्या ट्रीपचा आनंद घेत आहे. या ट्रीपचे अनेक फोटो तिने इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. या फोटोंमधील निसर्ग सौंदर्य सर्वांनाच भूरळ घालतं. त्यानंतर आता श्रेयाने आणखी काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि या फोटोंना तिने दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

आणखी वाचा-“कितीही उशीर झाला तरी…” पतीसाठी ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेची खास पोस्ट

इन्स्टाग्रामवर श्रेया बुगडेने सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणातील नदी किनाऱ्यावरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती जीन्स आणि ग्रीन कलरच्या स्वेटशर्टमध्ये खूपच कूल दिसत आहे. या फोटोंना श्रेयाने, “त्या अत्यंत दुर्मिळ क्षणांपैकी एक जेव्हा मला कॅप्शनसाठी काहीच सुचत नाही. ‘तुम्ही सल्ला द्या’ असं मी म्हणणार नाही कारण मला माहित आहे की तुमच्या सर्वांसाठी कामाचा सोमवार आहे.” असं मजेदार कॅप्शन दिलं आहे.

आणखी वाचा- Video: रितेशच्या ‘वेड लावलंय’वर सिद्धार्थ जाधवच्या लेकींचा धम्माल डान्स; अभिनेता म्हणाला, “या दोघींनी…”

दरम्यान श्रेयाच्या कामाबद्दल बोलायचं तर झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं आहे. याच कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे ही प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 18:01 IST
ताज्या बातम्या