scorecardresearch

Video: रितेशच्या ‘वेड लावलंय’वर सिद्धार्थ जाधवच्या लेकींचा धम्माल डान्स; अभिनेता म्हणाला, “या दोघींनी…”

सिद्धार्थ जावधच्या लेकींनी कारमध्ये बसून केला ‘वेड लावलंय’वर भन्नाट डान्स

riteish deshmukh, ved film, siddharth jadhav, siddharth jadhav share video, ved lavlay song, siddharth jadhav daughter, siddharth jadhav dance on ved lavlay, सिद्धार्थ जाधव, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, सिद्धार्थ जाधव इन्स्टाग्राम
(फोटो सौजन्य- सिद्धार्थ जाधव इन्स्टाग्राम)

रितेश देशमुखचा ‘वेड’ चित्रपट प्रदर्शित होऊन आता महिना उलटला तरीही त्याची क्रेझ काही अद्याप कमी झालेली दिसत नाही. या चित्रपटातील गाणी तर खूपच गाजली. विशेष म्हणजे चित्रपटातील ‘वेड लावलंय’ या गाण्याने तर सोशल मीडियावर एक ट्रेंडच सुरू केला आहे. अनेकांनी या गाण्यावर रील्स तयार करून शेअर केले आहेत. अशात आता अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या लेकींनीही या गाण्यावर चक्क कारमध्ये बसून डान्स केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होताना दिसतोय.

अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो आणि तो अनेकदा त्याच्या कामाच्या अपडेट्सबरोबरच दोन्ही मुलींबरोबरचे व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. आताही त्याने मुली ‘वेड लावलंय’ या गाण्यावर डान्स करत असतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय.

आणखी वाचा- आमिर खानचा भाचा पत्नीपासून विभक्त झाल्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट? व्हिडीओ व्हायरल

सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थसह त्याच्या दोन्ही मुली ‘वेड लावलंय’ची सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना सिद्धार्थने, “या दोघींनी मला वेड लावलंय” असं मजेदार कॅप्शन दिलं आहे. सोबतच या पोस्टमध्ये त्याने रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनाही टॅग केलं आहे. सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडलेला दिसत असून त्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा- Video: ‘वेड लावलंय’ची किली पॉललाही पडली भुरळ; व्हिडीओवर कमेंट करत रितेश देशमुख म्हणाला…

दरम्यान रितेश देशमुखचं दिग्दर्शन आणि जिनिलीया देशमुखची निर्मिती असलेल्या ‘वेड’ या मराठी चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात ७० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता आणि यातील तिच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 14:06 IST