Zee Chitra Gaurav 2025 : ‘झी चित्र गौरव २०२५’ पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण नुकतंच टेलिव्हिजनवर करण्यात आलं. यंदा सोहळ्याचं २५ वं वर्ष असल्याने अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. मराठीसह बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या छाया कदम यांचा या सोहळ्यात विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.

छाया कदम यांची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या भारतीय चित्रपटाला कान पुरस्कार सोहळ्यात मोठं यश मिळालं. यावेळी अभिनेत्री आईची साडी नेसून व त्यांची नथ घालून फ्रान्सला पोहोचल्या होत्या. ‘झी चित्र गौरव’चा होस्ट अमेय वाघने याबद्दलची खास आठवण त्यांना विचारली. यावेळी छाया कदम यांनी आपल्या आईची भावुक करणारी आठवण प्रेक्षकांना सांगितली.

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात छाया कदम यांचा विशेष योगदान पुरस्कारने सन्मान करण्यात आला. यानंतर भावना व्यक्त करत अभिनेत्री म्हणाल्या, “कुठेही जगभर फिरलो तरी, घरी आल्यावर घरच्या माणसांनी पाठ थोपटल्यावर जसं भरून येतं तसंच आज मला वाटतंय. कान महोत्सवाला जाताना मी असं खूप काही ठरवलं नव्हतं पण, साडी नेसायची हे नक्की ठरवलं होतं. माझ्या आईची नथ मी माझ्याबरोबर घेऊन गेले होते. माझी आई आणि मी बरीच वर्षे एकत्र राहत होतो. आईवर माझा खूप जीव होता आणि माझ्या आईची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला पण, एक राहून गेलं होतं ते म्हणजे तिला विमानात बसायचं होतं, त्यातून मला तिला फिरवायचं होतं. मग, हा सिनेमा आला…मला असं झालं आई नाही पण, तिची साडी आपण नक्की नेसूयात. साडी आणि आईच्या लग्नाची नथ मी माझ्याबरोबर घेऊन गेले होते.”

७७ व्या कान्स चित्रपट महोत्सवात पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाला स्टॅण्डिंग ओव्हेशन मिळालं होतं. यानंतर या चित्रपटाची संपूर्ण टीम भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या सोहळ्याला मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम सुद्धा उपस्थित होत्या.

View this post on Instagram

A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्या आजवरच्या प्रवासातल्या सगळ्यांचे खूप खूप आभार…की, तुमच्यामुळे आज ही छाया इथवर पोहोचली आहे. खूप समाधान – आनंद आणि मन भरून आलं” असं सांगत छाया कदम यांनी चाहत्यांसह कलाकार मित्रमंडळींचे आभार मानले आहेत.