झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवा राज्य’ ही मालिका सातत्याने चर्चेत आहे. याच मालिकेत झळकणारी बालकलाकार साईशा भोईरने मालिका सोडल्याचं बोललं जात आहे. नुकतंच याबद्दलची माहिती समोर आली आहे. साईशा भोईरच्या जागी आता आरोही सांबरे ही बालकलाकार मालिकेत दिसणार आहे.

मराठी मालिकांमध्ये झळकलेली बालकलाकार साईशा भोईर हिची आई पूजा भोईरला गेल्या महिन्यात पोलिसांनी अटक केली होती. पूजा भोईर हिच्यावर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी पूजा भोईर कल्याणच्या घरातून ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणानंतर साईशा मालिकेतून ब्रेक घेणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण त्यानंतरही साईशा ही या मालिकेत झळकताना पाहायला मिळाली.
आणखी वाचा : ९१ हजार फॉलोवर्स, सोशल मीडिया स्टार; ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कार्तिकी नक्की कोण?

मात्र आता नवा गडी नवा राज्य या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोत साईशा दिसत नाही. तिच्या जागी आरोही सांबरे ही नवीन बालकलाकार मालिकेत दिसणार आहे. आरोहीच्या इन्स्टाग्राम अकाऊटंवर एक प्रोमो शेअर करत ही अपडेट देण्यात आली आहे.

साईशा ‘नवा गडी नवा राज्य’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या दोन शोमध्ये काम करताना दिसत होती. तिच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर साईशा या मालिकांमध्ये काम करणार की नाही, याबद्दल शंका उपस्थित केली होती. यादरम्यान सुरुवातीला साईशाच्या कामावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं म्हटलं जात होतं. साईशाला तिच्या घरात काय सुरु आहे, काय घडतंय हे कळण्याइतपत ती मोठी नाही. सध्या तिच्या आईसोबत जे काय घडतंय याची माहिती नाही. ती शूटिंग करत आहे. सेटवरही हो बोलणं टाळतोय. साईशाला कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी घेतोय, असंही सांगण्यात आलं होतं. पण त्यानंतर आता हे प्रकरण वाढत असल्यानं साईशाच्या काळजीपोटी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

आणखी वाचा : ‘रंग माझा वेगळा’मधील कार्तिकी फेम साईशा भोईरनं सोडली मालिका, कारण देताना म्हणाली “मला खूप…”

दरम्यान साईशा ही मालिकेत झळकण्यापूर्वी सोशल मीडिया स्टार म्हणून लोकप्रिय होती. तिची लोकप्रियता पाहून तिला एका मालिकेसाठी विचारण्यात आलं होतं. त्यानंतर साईशाने ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत बालकलाकार म्हणून एंट्री घेतली. यानंतर तिची लोकप्रियता वाढली. पण काही महिन्यांनंतर साईशाने या मालिकेला रामराम केला. तिच्या पालकांनी साईशाच्या शाळेसाठी, अभ्यासासाठी मालिका सोडल्याचं सांगितलं.

आणखी वाचा : बालकलाकार साईशा भोईरच्या आईच्या पोलीस कोठडीत वाढ; आणखी तक्रारी आल्याची पोलिसांची माहिती, नेमकं प्रकरण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर काहीच दिवसात ती दुसऱ्या एका वाहिनीवरील मालिकेत झळकली. त्यानंतर साईशाच्या पालकांना प्रेक्षकांनी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं होतं.