छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणजे ‘सीआयडी.’ या मालिकेने लहानांपासून ते थोरमोठ्यांपर्यंत अनेकांची मने जिकंली होती. मालिकेतील एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे घराघरात पोहोचली होती. २०१८ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र अजूनही या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आता या मालिकेतील एसीपी प्रद्युमन आणि इन्स्पेक्टर अभिजीत यांचा नवा लूक समोर आला आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्य मांजरेकर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच सत्य मांजरेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत सत्य मांजरेकरने एसपी प्रद्युमन म्हणजे शिवाजी साटम आणि इन्स्पेक्टर अभिजीत फेम आदित्य श्रीवास्तव दिसत आहे.
आणखी वाचा : “वर्षा बंगल्यात शिरताना मनात…”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “मुख्यमंत्री म्हणून यांच्या हातून…”

यात अभिजीत आणि एसीपी प्रद्युमन या दोघांचा लूक फारच वेगळा दिसत आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात या दोघांच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

satya manjrekar
सत्य मांजरेकर

आणखी वाचा : “यावर्षीचे देखावे…” पुण्यातील गणपती दर्शनानंतर प्रिया बेर्डेंची पोस्ट, म्हणाल्या “तो योग आज…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ही मालिका टेलिव्हिजनवर कायमच प्रसिद्धीच्या झोतात होती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच प्रेक्षक याचे चाहते होते. २८ जानेवारी १९९८ मध्ये या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला होता. यातील प्रत्येक भूमिका तुफान गाजलेली. एसीपी प्रद्युम्न, सीनियर इन्स्पेक्टर दया, सीनियर इन्स्पेक्टर अभिजीत या सर्व भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.