कॉमेडियन भारती सिंह सध्या चर्चेत आहे. विनोदाची उत्तम जाण असणाऱ्या भारतीने कौशल्याच्या जोरावर कलाविश्वात लाफ्टर क्वीन अशी ओळख मिळवली. २०१७ मधये भारतीने हर्ष लिंबाचियासह विवाह केला. ३ एप्रिल २०२२ रोजी त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. भारती व हर्षने लाडक्या लेकाचं नाव ‘लक्ष’ असं ठेवलं आहे.

भारतीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गरोदरपणातील अनुभव सांगितला. ती म्हणाली, “खतरा खतरा या शोच्या शूटिंगदरम्यानच मला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या होत्या. मी स्टेजवर अँकरिंग करत असताना माझ्या पोटात दुखू लागलं. पहिल्याच गरोदरपणात तुम्हाला अंदाज येत नाही. शूटिंग संपल्यावर डॉक्टरांना फोन करू, असा विचार मी केला. प्रसुतीच्या कळा सुरू असतानाही मी शूटिंग पूर्ण केलं”.

हेही वाचा>> मलायका अरोरापासून दूर जाण्याची अरबाज खानला वाटायची भीती, अभिनेत्यानेच केलेला खुलासा

हेही वाचा>> ३२व्या वर्षी मालिकाविश्वातील अभिनेत्रीने केले Eggs Freeze, म्हणाली “भविष्यात लग्न…”

“शूटिंग संपल्यानंतर मी डॉक्टरांना फोन केला. दर १५ मिनिटांनी माझ्या पोटात दुखत आहे, असं मी डॉक्टरांना सांगितलं. त्यावर या प्रसुतीच्या कळा आहेत, असं मला डॉक्टर म्हणाले. शूटिंग संपवून घरी आल्यानंतर मला ही गोष्ट जाणवली. तेव्हा पहाटे ४-५ वाजले होते. आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता. त्यामुळे हर्ष आणि मी दोघंच रुग्णालयात गेलो. आम्ही स्टाफ, आई-वडील, कुटुंबीय, नातेवाईक यापैकी कोणालाही फोन केला नाही”, असं भारतीने सांगितलं.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब झळकली हिंदी जाहिरातीत, व्हिडीओ पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारती पुढे म्हणाली, “चांगल्या गोष्टीसाठी रुग्णालयात जात असल्याने आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता. रुग्णालयात गेल्यानंतर हर्षने याची माहिती सगळ्यांना दिली. त्यानंतर मी गोंडस मुलाला जन्म दिला”. भारती व हर्ष त्यांच्या लाडक्या लेकाला लाडाने गोला असं म्हणतात.