यंदा ‘बिग बॉस’चे चौथे पर्वाचा रंजक प्रवास आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. ‘बिग बॉस’चे चौथे पर्व सुरु झाल्यापासून ते सातत्याने चर्चेत आहे. हे पर्व सुरु झाल्यामुळे त्यातील ट्वीस्ट, स्पर्धकांचे मतभेद, कामांवरुन होणारे वाद आणि खेळ यावरुन यंदा ‘बिग बॉस’चे पर्व चांगलेच गाजले. ‘ऑल इज वेल’ या थीमवर आधारित असणाऱ्या ‘बिग बॉस’चा महाअंतिम सोहळ्याला आता फक्त २च दिवस शिल्लक आहेत. स्पर्धकांना हसवायला येणार आहेत आता एकसे एक विनोदवीर…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘फु बाई फु’ फेम ओंकार भोजने, भूषण कडू, आशिष पवार यांच्या विनोदाने स्पर्धकांचा ताण काही काळ दूर जाणार आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रेटी येत असतात. आज रात्री १० वाजता हा भाग पाहता येणार आहे. तसेच माजी बिग बॉस सदस्य जसे की स्मिता गोंदकर, मीरा जगन्नाथ हे कलाकार स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी येत असतात. नुकतेच ‘वेड’ चित्रपटातले मुख्य कलाकार रितेश देशमुख आणि जिनीलिया देशमुख या कार्यक्रमात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पर्वाची सुरुवात २ ऑक्टोबरला झाली होती. यावेळी तब्बल १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होते. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरातून प्रसाद जवादे बाहेर पडला. त्यानंतर आता ‘बिग बॉस’च्या घरात मीड विक एव्हिकेशन पार पडले. यात अभिनेता आरोह वेलणकरला घराबाहेर जावे लागले. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले.