scorecardresearch

‘तारक मेहता…’ मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार, दिशा वकानी व ‘बाघा’चा फोटो व्हायरल

Tarak Mehta Ka Oolta Chashmah: ‘दयाबेन’ची होणार मालिकेत एन्ट्री

‘तारक मेहता…’ मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार, दिशा वकानी व ‘बाघा’चा फोटो व्हायरल
'तारक मेहता' मालिकेत होणार दयाबेनची एन्ट्री. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीमः

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेली १४ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीलाही याच मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली.

दयाबेन साकारुन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या दिशा वकानीने वैयक्तिक कारणामुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यामुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्येही प्रेक्षकांनी दयाबेनची कमी जाणवत होती. परंतु, आता लवकरच दयाबेन पुन्हा एकदा मालिकेत एन्ट्री घेणार आहे. त्यामुळे पुन्हा दयाबेनची जादू प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. दयाबेन लवकरच मालिकेत एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

हेही वाचा>> ‘पठाण’च्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच दीपिका पदुकोणचं ‘बेशरम रंग’ गाण्याबाबत वक्तव्य, म्हणाली…

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी याबाबत भाष्य केलं आहे. मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चांना त्यांनी दुजोरा दिला आहे. परंतु, दयाबेनचं पात्र दिशा वकानी साकारणार का याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु, याच दरम्यान दयाबेन व बाघाचा एक फोटो व्हायरल होत आहे.

हेही वाचा>>अथिया शेट्टीच्या लग्नात सुनील शेट्टीचे डोळे पाणावले; लेक सप्तपदी घेताना भावूक झाला अभिनेता

हेही पाहा>> KL Rahul-Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी-के.एल.राहुलने घेतली सप्तपदी, पाहा शाही विवाहसोहळ्यातील खास फोटो

दिशा वकानी व मालिकेतील ‘बाघा’चा हा फोटो तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील नसून एका नाटकातील आहे. दिशा वकानीने २०१७ साली प्रेग्नन्सीमुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती मालिकेत परतण्याच्या चर्चा होत होत्या. पण दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर मालिकेत पुनरागमन करणार नसल्याचं सांगत दिशा वकानीने या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 11:22 IST

संबंधित बातम्या