अभिनेता सुव्रत जोशी मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. मालिका, चित्रपट नाटक या माध्यामातून त्याने प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठीबरोबर त्याने आता हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या सुव्रत अनेक तरुणींचा क्रश बनला आहे. नुकतच एका मुलाखतीत सुव्रतने मुलींना कसं इम्प्रेस करायचं याबाबतच्या टीप्स दिल्या आहेत.
हेही वाचा- “आयुष्याची काही वर्ष…” लतादीदींसाठी अभिजीत केळकरनं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला…
नुकतच सुव्रत जोशी आणि सखी गोखलेने लोकमत फिल्मी या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत दोघांनी खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. यावेळी सुव्रतने मुलींना कसं इम्प्रेस करायचं याबाबतच्या टीप्स दिल्या आहेत. सुव्रत म्हणाला. बरेचदा मुलांना वाटत मुलींना आवडणाऱ्या गोष्टी केल्या म्हणजे त्या आपल्यावर इम्प्रेस होतील. पण प्रत्येकवेळी तेवढच पुरेसं नसतं. मुलांनी स्वत: एक चांगला माणून बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या मुलीच्या तुम्ही प्रेमात आहात तिला आदराने वागवा. तिच स्वतंत्र अस्तित्व मान्य करा. तिला चारचौघांमध्ये घालूनपाडून बोलू नका. तिला कमी लेखू नका.”
सुव्रत पुढे म्हणाला, “मुलींच्या होकाराचा आणि नकाराचा आदर करण खूप महत्वाचं आहे. तिने काही गोष्टींना नकार दिला तर तो का नकार दिला याचा आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे मुलींना इम्प्रेस करायचं असेल तर हे पापड तुम्हाला बेलावे लागतील. हे जास्त महत्वाच आहे. यामुळे तुम्हाला हव्या असणाऱ्या मुलीचं प्रेमही मिळेल, आदरही मिळेल आणि कदाचित तुमचं तिच्याबरोबर लग्नही होईल.”
सुव्रतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमधून तो पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आला या मालिकेत सखी आणि सुव्रतने पहिल्यांदा एकत्र काम केलं. त्यानंतर दोघे ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकात एकत्र दिसले होते. नुकतीच सुव्रतची ‘ताली’ ही हिंदी वेबसिरीज प्रदर्शित झाली. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनची मुख्य भूमिका आहे. यामध्ये सुव्रतने तृतीयपंथीची भूमिका साकारली आहे. २०१९ मध्ये सुव्रतने अभिनेत्री सखी गोखलेशी लग्नगाठ बांधली. सखी आणि सुव्रतची पहिल्यांदा ओळख ‘दिल दोस्ती दुनियादारी’ च्या सेटवर झाली होती. हळूहळू त्या ओळखीच रुपांतर प्रेमात झालं आणि नंतर त्यांनी लग्न कऱण्याचा निर्णय घेतला.