Bigg Boss OTT Fame Actress Talks About Her marriage : लग्न संकल्पनेबद्दल अनेकांचे वेगवेगळे विचार असलेले पाहायला मिळतात. काही लोक एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतात तर काही लग्न न करताता एकत्र राहताना दिसतात. यामध्ये काही कलाकारांचाही समावेश आहे. लोकप्रिय अभिनेते राहुल देव व मुग्धा गोडबोले, अभिनेत्री डायना पेंटी ही मंडळी लग्न न करता गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या जोडीदारासह एकत्र लिव्ह इनमध्ये राहत आहेत. अशातच आता अजून एका लोकप्रिय अभिनेत्रीने लग्न संकल्पनेबद्दल वक्तव्य केलं आहे.
‘बिग बॉस ओटीटी’, ‘स्प्लिट्सव्हिला’, ‘एमटीव्ही ऐस ऑफ स्पेस’ अशा रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या अग्रवाल. दिव्य अग्रवाल तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. ती तिच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. अशातच आता तिनं एका मुलाखतीमध्ये तिच्या नवऱ्याबद्दल वक्तव्य केलं आहे.
दिव्यानं नुकतीच ‘फिल्मी ग्यान’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिनं तिच्या लग्नाबद्दल सांगितलं आहे. दिव्यानं मराठी उद्योजक अपूर्व पाडगावकरसह गेल्या वर्षी २० फेब्रुवारी रोजी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला आता एक वर्ष होऊन गेलं आहे. आता दिव्यानं तिच्या नवऱ्याबद्दल वक्तव्य केलं आहे.
दिव्यानं मुलाखतीमध्ये तिच्या नवऱ्याचा लग्न या संकल्पनेवर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. ती म्हणाली, “आम्ही जेव्हा एकमेकांना डेट करीत होतो आणि काही काळानतंर लग्न करायचं का याबद्दल आम्ही चर्चा करीत होतो तेव्हा अपूर्वला त्यामध्ये फार रस नव्हता. त्याला लग्नामध्येच कधी रस नव्हता. तो अजूनही लग्न या संकल्पनेवर विश्वास ठेवत नाही”.
दिव्या तिचा नवरा अपूर्वबद्दल पुढे म्हणाली, “त्याचा लग्न या संकल्पनेवर विश्वास नाहीये; पण माझ्याशी लग्न करून तो आनंदी आहे”. दिव्यानं या मुलाखतीमध्ये त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा सगळ्या गोष्टी फार हळूहळू सुरू होत्या. आम्ही दोन महिन्यांनी एकदा कधीतरीच भेटायचो”.
दिव्या पुढे म्हणाली, “आमचे विचार खूप जुळतात. कुटुंब, जवळची माणसं या सगळ्यांबाबत आम्ही सारखाच विचार करतो, आम्ही खूप भावनिक आहोत. त्यामुळे आमच्यामध्ये जेव्हा भांडणं होतात तेव्हासुद्धा आम्ही समजूतदारपणे त्यावर चर्चा करतो”.
दरम्यान, दिव्या अग्रवालच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं ‘द फायनल एक्झिट’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. दिव्यानं यासह ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स २’ या वेब सीरिजमध्येही काम केलं होतं. त्यासह ती ‘कार्टेल’ या सीरिजमध्येही झळकली होती. दिव्यानं ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. तर, दिव्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती. त्यामुळे ती त्यावेळी बरीच चर्चेत आली होती.