राष्ट्रवादीचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या आगामी भागात हजेरी लावणार आहेत. त्या भागाचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये डॉ. कोल्हे राजकारणाबद्दल व अभिनयक्षेत्राबद्दल विचारलेल्या प्रश्नांची सडेतोड उत्तरं देतात. या शोमध्ये निवेदक अवधूत गुप्तेने कोल्हे यांना एक फोन करायला सांगितलं. त्यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी लोकशाहीला फोन लावला.

तुमचं एका दिवसाचं मानधन जास्त की डॉक्टर मित्रांचं? डॉ. अमोल कोल्हे म्हणाले…

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “लोकशाहीच ना? नाही, आवाज थोडा खाली गेल्यासारखा जाणवला म्हणून विचारलं. कारण कसंय तू असण्यात, तू टिकण्यात १४० कोटी भारतीयांचं भवितव्य अवलंबून आहे. काही प्रश्न मनात होते म्हणून म्हटलं फोन करावा. प्रश्न पडले तरी ते विचारण्याचा अधिकार घटनेने दिला आहे, पण ते विचारण्याची आता मुभा नाही, मोकळीक नाही. कारण प्रश्न विचारले की ट्रोलधाड येते आणि देशद्रोह्याचा शिक्का मारून जाते आमच्या मस्तकावर. सियाचिनला मायनस २० डिग्री सेल्सियसमध्ये देशांच्या सीमांचं रक्षण मुलगा करत असतो आणि त्याचा ७५ वर्षांचा बाप दिल्लीत कडाक्याच्या थंडीमध्ये त्याच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करत असतो. त्या आंदोलकांपैकी काहींना मगरूर सत्ताधाऱ्यांच्या गाडीखाली निष्ठुरपणे चिरडलं जातं, तेव्हा प्रश्न निर्माण होतो की कुठल्या तोंडाने म्हणायचं जय जवान, जय किसान?”

KFC चा फुल फॉर्म काय? या फूड कंपनीची स्थापना कोणी केली होती? रंजक आहे कहाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक अवधूत गुप्ते याने अमोल कोल्हेंना काही प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांना एका गोळीचा फोटो दाखवत ही डोकेदुखी गोळी कोणाला द्याल?, असा प्रश्न अमोल कोल्हेंना विचारला. त्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस असे उत्तर दिले. तर, स्मरणशक्ती वाढवण्याची गोळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार असल्याचं ते म्हणाले.