‘झी मराठी’ वाहिनीवर कालपासून (४ डिसेंबर) हार्दिक जोशीचा ‘जाऊ बाई गावात’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो सुरू झाला आहे. एक अफलातून संकल्पना असलेल्या या नवीन रिअ‍ॅलिटी शोमध्ये श्रीमंत आणि शहरात वाढलेल्या मुली गावरान आयुष्य जगू शकणार का? हे पाहायला मिळणार आहे. काल या शोमध्ये एकूण ११ स्पर्धक मुलींची निवड झाली. यामध्ये प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाय याच्या एक्स गर्लफ्रेंडचा देखील सहभाग आहे.

‘जाऊ बाई गावात’चा काल पहिला भाग प्रसारित झाला. यामध्ये शोमधील स्पर्धक मुलींची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या मतावरून ११ स्पर्धक मुलींना निवडण्यात आलं. यामध्ये पहिली स्पर्धक होती मुक्ता करंदीकर; जी रॅपर आणि गायिक आहे. हिच मुक्ता प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटायची एक्स गर्लफ्रेंड आहे. दोघांचा काही वर्षांपूर्वी ब्रेकअप झाला होता. त्यानंतर मुक्ता ‘एमटीव्ही’वरील ‘लव्ह स्कूल सीझन ४’मध्ये झळकली होती. आता तिची ‘जाऊ बाई गावात’च्या घरात दमदार एन्ट्री झाली आहे. त्यामुळे ती या गावात करू शकेल का ही रॉक? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: मुक्ता-सागरची लगीनघाई! जेवणाचा मेनू ठरवताना गोखले-कोळी कुटुंबात पुन्हा पडली वादाची ठिणगी

हेही वाचा – Bigg Boss 17: मन्नारा चोप्राने अंकिता लोखंडेच्या तोंडावर फेकली कॉफी; नॉमिनेशनदरम्यान झाला हंगामा, पाहा नवा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुक्ता व्यतिरिक्त डॅशिंग लेडी डॉन स्नेहा भोसले, छोटा पॅकेट बडा धमाका अंकिता मेस्त्री, सुरेल संस्कारी गायक श्रेजा म्हात्रे, पापा की परी संस्कृती साळुंखे, फॅशन दिवा रसिका ढोबळे, आपल्या मनाची राणी असलेली वर्षा हेगडे, मॉडेल हेत पाखरे, अभिनेत्री, फोटोग्राफर वैष्णवी सावंत, रमशा फारुकी आणि मोनिशा आजगावकर या ११ स्पर्धक मुलींची ‘जाऊ बाई गावात’च्या घरात एन्ट्री झाली आहे.