अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मालिकेची कथा आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. लवकरच गोखले व कोळी कुटुंबात सनई-चौघडे वाजणार आहेत. मुक्ता व सागरच्या होकारानंतर दोन्ही कुटुंबात लग्नाची जोरदार तयार सुरू झाली आहे. पण यादरम्यान जेवणाच्या मेनूवरून पुन्हा एकदा गोखले व कोळी कुटुंबात वादाची ठिणगी पडली आहे. याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागात सागर लग्नासाठी तयार झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण मुक्ता एका अटीवर लग्न करायला तयार झाली आहे. “मिहीरने स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर मी हे लग्न करेन,” अशी अट मुक्ताने सागरला घातली आहे. यावर सागर म्हणतो, “मी तुम्हाला शेवटचं सांगेन, एक नातं जोडण्यासाठी दुसरं नातं मी तोडत नाही. मी कधीच त्याला जेलमध्ये जाऊ देणार नाही.” मुक्ता व सागरचं बोलणं मिहीर ऐकत असतो. त्यामुळे आता तो सईच्या आनंदासाठी पोलिसांना शरण जायला तयार होतो.
मालिकेच्या आजच्या भागामध्ये मिहीर स्वतःहून पोलिसांना शरण जाणार आहे. यामुळे मुक्ता देखील लग्नाला होकार देताना दिसणार आहे. दोन्ही कुटुंबात आता आनंदाच वातावरण पाहायला मिळणार आहे. मुक्ता व सागरच्या होकारानंतर गोखले व कोळी कुटुंबाने लग्नाची जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे. पण यादरम्यान पुन्हा एकदा दोन्ही कुटुंबात एका गोष्टीवर वादाची ठिणगी पडते. ती गोष्ट म्हणजे लग्नाचा मेनू.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या पुढील भागात गोखले व कोळी कुटुंब बोलणी करताना दिसणार आहेत. यावेळी मुक्ताची आई म्हणते, “आपण छानशी कढी ठेवू या.” यावर सागरची आई म्हणते, “याबरोबर मटण आणि फिश फ्रायचा पण स्टॉल लावूयात.” त्यानंतर ताडकन उठून मुक्ताची आई म्हणते, “नाही, नाही हे शक्य नाही.” मग सागरची म्हणते, “म्हणजे? आमच्याकडच्या पाहुण्यांना काय कढी भात खायला घालू.” यावर मुक्ताची आई म्हणते, “हे गोखल्यांच्या घरचं कार्य आहे.” सागरची आई म्हणते, “हे इंद्रा कोळीच्या पोराचं लग्न आहे.” मग मुक्ताची आई म्हणते, “ते लग्न होईल तेव्हा ना.” अशाप्रकारे लग्नाच्या मेनूवरून पुन्हा एकदा गोखले व कोळी कुटुंबात वादाला सुरुवात होते.
हेही वाचा – प्रसिद्ध रॅपर बादशाह पाकिस्तानी अभिनेत्रीला करतोय डेट? फोटो झाले व्हायरल
दुसऱ्याबाजूला मुक्ता व सागर लग्नाविषयी बोलण्यासाठी भेटतात. तेव्हा मुक्ता म्हणते, “माझ्या आईला माझं लग्न छान साग्र संगीत व्हायला हवं होतं. माझीही इच्छा आहे तशी.” यावर सागर म्हणतो, “थाटामाटात केलेली लग्न टिकतातच असं नाही. पण आपल्याला हे लग्न टिकवायचं आहे, सईसाठी.”
दरम्यान, आता मुक्ता व सागरच्या लग्नासाठी दोन्ही कुटुंब कशाप्रकारे तयारी करतात? यादरम्यान काय-काय नाट्य घडतं? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.