अशनीर ग्रोव्हर आणि त्याने सुरू केलेली फीनटेक कंपनी BharatPe यांच्यात सुरू असलेला कायदेशीर वाद दोन्ही बाजूंनी सुटलेला दिसत नाही. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीच्या आरोपाखाली अशनीर ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध नवीन गुन्हा दाखल केला आहे. ‘भारतपे’च्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे.

१० मे रोजी, EOW(Economic Offences Wing) ने भारतपेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर, त्याची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर आणि दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांविरुद्ध ८१ कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा : ‘जी ले जरा’ या आगामी चित्रपटासाठी आलिया भट्ट प्रचंड उत्सुक; म्हणाली “बॉलिवूडमध्ये नव्या…”

हे प्रकरण गेल्या वर्षभरापासून सुरू आहे, यापूर्वी अशनीर ग्रोव्हरने कोटक बँकेच्या कर्मचार्‍यांशी केलेल्या गैरवर्तनाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये माधुरी जैन यांना फसवणुकीच्या आरोपावरून कंपनीतून काढून टाकण्यात आले. यानंतर अशनीर ग्रोव्हरने १ मार्च २०२२ रोजी कंपनीच्या पदाचा राजीनामा दिला. अशनीरच्या पत्नीने कंपनीच्या फंडातील पैसे स्वतःच्या खासगी गोष्टींसाठी खर्च केल्याचा आरोपही कंपनीने केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे, डिसेंबर २०२२ मध्ये, भारतपेने कंपनीच्या निधीचा प्रचंड गैरवापर केल्याबद्दल अशनीर ग्रोवर, त्याची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी कारवाई सुरू केली होती. ग्रोव्हर कुटुंबातील सदस्यांनी बनावट बिल, विक्रेत्याचे पेमेंट आणि वैयक्तिक वापर अशा वेगवेगळ्या मार्गांनी कंपनीची फसवणूक केल्यामुळे १८ टक्के व्याजासह ८८.६ कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केली. आता या प्रकरणाचा निकाल काय लागेल हे येणारी वेळच ठरवेल.